हे अँप आहे तुमच्या अतिशय कामाचे जे तुम्ही सुरु करू शकता 2 मिनटात.

This Application is very useful for you, you can install it just few steps.

DigiLocker:

एसटी बसने प्रवास करा किंवा रेल्वे ने प्रवास करा. एका विशिष्ट प्रकारचे पाकीट विकणारा विक्रेता नेहमी तुमच लक्ष वेधत असतो. त्याच्याकडच्या त्या पाकिटात तुम्ही तुमचे वेगवेगळे कार्ड जस की आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड यामध्ये ठेवू शकता. अस हे पाकीट किंवा कार्ड होल्डर जवळपास सर्वानी कधी ना कधी विकत घेतलेले आहे.

Digilocker हा शब्द तुम्ही कधी ना कधी कोणाच्या तरी तोंडून एकला असेलच. हे नेमक कसल लॉकर आहे. यामध्ये आपण काय बर ठेवू शकतो?

Digilocker पण काहीशी अशीच संकल्पना आहे, इथे तुम्ही तुमचे वेगवेगळे महत्वाचे दस्तावेज कागदपत्र सुरक्षित ठेऊ शकतात. जेव्हा तुम्हाला कुठे त्याची पडताळणी करायची असते किंवा दाखवायचे असतात, त्या वेळी तुम्ही ते दाखवू शकता आणि त्याची किंमत(value) ही original म्हणजेच मूळ कागदपत्रा इतकीच असते.

यामुळे तुमचे महत्वाचे कागदपत्र तुम्हाला सोबत बाळगण्याची गरज नाही. तुमचे कागदपत्र खराब होत नाहीत, गहाळ होत नाहीत किंवा चोरीला जात नाहीत, त्यांचा गैरवापर होत नाही.  

DigiLocker हे एक data storage म्हणजेच माहिती साठवण्यासाठी तयार केलेले तंत्रज्ञान आहे. हे संशोधन व त्याचा विकास इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार (Ministry of Electronics and IT) ने केला आहे. इथे तुम्ही तुमचे पॅनकार्ड, ABHA कार्ड, तुमच्या मार्कशीट, वाहन परवाना इत्यादी store करून ठेऊ शकतात.

DigiLocker मध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट cloud ला store करत असता. Govt of India ने जी “Digital India” ची मोहीम सुरू केली होती त्या अंतर्गत हे अॅप्लिकेशन सुरू केले आहे. याचा उपयोग तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट ची पडताळणी करण्यासाठी देखील करू शकतात.
उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे कागदपत्र DigiLocker मध्ये save केल्यानंतर, तुम्ही तुमचे DMat Account उघडू शकता. त्याचे KYC verification authentication stock broker कडून होते.

DigiLocker मुळे तुम्हाला तुमचे महत्वाचे आणि खरे ओरिजनल कागदपत्र नेहमी सोबत न बाळगता एका ठिकाणी साठवून (store) करून ठेवता येतात. तिथे तुमचे कागदपत्र सुरक्षित राहतात. जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी त्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे त्या वेळी त्याचा तुम्ही उपयोग करू शकतात.
उदा: तुम्ही तुमच्या गाडीचे सर्व कागदपत्र DigiLocker मध्ये store केलेली आहेत. एखादे दिवशी rto ने तुमची गाडी तपासणीसाठी थांबवली तर तुम्ही तुमच्या DigiLocker चा उपयोग करून 2 मीन मध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट दाखवून पडताळणी करू शकतात. यामुळे तुमचा आणि समोरील व्यक्तीचा असा दोघांचा देखील वेळ वाचतो. तुमचे कागदपत्र गहाळ होण्याची, खराब होण्याची, चोरीला जाण्याची भीती राहत नाही. 

Digilocker चा उपयोग तुम्ही तुमचे वैद्यकीय कागदपत्र ठेवण्यासाठी पन करू शकतात. हे कागदपत्र तुम्ही आयुषमान भारत ID च्या अंतर्गत save करू शकतात. ही सुविधा जून 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. हे cloud storage सरकारी यंत्रणणा एखाद्या व्यक्तीची माहिती पडताळण्यासाठी परवानगी देते. पण त्यासाठी त्या व्यक्तीची पूर्व परवानगी आवश्यक असते.

DigiLocker चे काही वैशिष्ट्य:

(Features of DigiLocker)

  • DigiLocker मध्ये आपण वाहनपरवाना(Driving Licence), वाहणाचे rc book, insurance पावती, मार्कशिट, तुमचे इतर ओळखपत्र ठेवू शकता
  • एक user साठी 1GB पर्यन्त storage असते. म्हणजे तुम्ही 1GB पर्यन्त कितीही कागदपत्रे store करू शकतात.
  • तुम्ही तुमच्या आधारकार्ड चा उपयोग करून DigiLocker चे खाते उघडू शकता. त्यासाठी तुमचे आधारकार्ड मोबाइल नंबर सोबत लिंक असयला हवे ज्यामुळे तुम्ही OTP टाकून DigiLocker चे खाते उघडू शकाल.
  • सामान्य लोकांसाठी DigiLocker जुलै 2015 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केले गेले. सुरवातीला यूजर साठी फक्त 100MB storage मर्यादा होती.

व्यवसाय / उद्याजकांसाठी महत्वाच्या टिप्स ज्या वाढवतील 10 पट व्यवसाय.

अस करा सुरू तुमच DigiLocker

  • www.digilocker.gov.in/ या वेबसाइट ला भेट दया आणि तुमच्या मोबाइल नंबर आणि आधार कार्डचा वापर करून sign – up करा. किंवा तुम्ही Android/iOS आपलिकेशन ने पण sign–up करू शकतात.
  • (जर तुमचे आधार कार्ड मोबाइल नंबर सोबत लिंक नसेल तर तुम्ही ते जवळच्या आधार केंद्र मध्ये जाऊन लिंक करू शकता. त्यासाठी सरकार ने ठरवून दिल्या प्रमाणे फिस भरणे आवश्यक असते.)
  •  sign-up ची माहिती भरल्या नंतर तुम्हाला pin तयार करावा लागतो. पिन (पासवर्ड) तयार केल्या नंतर तो कोणसोबत share करू नका. पिन विसारण्यासारख असेल किंवा नसेल तरीही तो योग्य ठिकाणी लिहून ठेवा.
  • तुमचं Email ID टाका.
  • User ID आणि Password तयार करा.
  • Account तयार केल्या नंतर काही external plug-ins dashboard वर दिसतील. जसे की income-tax plug-ins, motor vehicles, icse / isc मार्कशिट साठी cisce plugins.
  • तुम्हाला जे डॉक्युमेंट घ्यायचे आहे त्या plugin वर क्लिक करा आणि इम्पोर्ट करा.  
पोलिसांनी गाडी पकडल्यावर DigiLocker Document वैध आहे का?
DigiLocker हा फक्त एक तांत्रिक प्लॅटफॉर्म नाही. Ministry of Electronics and IT ने काही नियम अधिसूचित केले आहेत. 
Information Technology Act, 2000 मध्ये काही सुधारणा करून असे सूचित केले आहे, की Digilocker मधून share केलेले डॉक्युमेंट हे Physical Document इतकेच वैध असतील. 
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मोबाइल मध्ये किंवा google drive ला ठेवलेले document वैध आहेत अस नाही तर digilocker मधील document वैध आहेत. त्यामुळे गैरसमज करू नका. 
खालील पद्धतीचे Security Measures (सुरक्षेसाठी उपाय) Digilocker वापरते. 
1) 256 Bit SSL Encryption
2) Mobile Authentication Based Sign Up (म्हणजे login वेळी तुम्हाला OTP येतो. )
3) ISO 27001 certified Data Centre
4) Timed Log out
म्हणजे तुम्ही ठरविक कालावधीत काही अॅक्टिविटी केली नाही तर तुम्ही आपोपप logout होत असता. 
5) Security Audit
म्हणजे काही ठराविक काळानंतर तुम्हाला काही login details परत भरावे लागतात यामुले तुमच account secure राहते.
 
या DigiLocker मध्ये आता तुम्ही तुमचे पासपोर्ट देखील ठेवू शकणार आहात. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इतर संबंधित मंत्रालयांसोबत बातचीत करत आहेत. आणि त्यासाठी technical development चे काम सुरू आहे. 

कुठेलही Digital App वापरताना योग्य काळजी घ्यावी.

1) Application चा पासवर्ड कोणाशी ही शेअर करू नका. तुमचा मोबाइल नंबर, जन्म तारीख, मुलांची नाव, आई-वडिलांचा मोबाइल नंबर, name@123 असे सोपे पासवर्ड ठेवू नये. 
2) आपले पासवर्ड वेळोवेळी change (बदलत) राहावे. जवळच मित्र किंवा नातेवाईक आहे म्हणून आपला पासवर्ड share करू नये.
3) दुसऱ्या कोणाच्या मोबाइल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये आपले एखादे account वापरण्यासाठी उघडताना पुढील काळजी घ्या. 
A) Login च्या वेळी SAVE ME किंवा Remember असा option येतो त्यावेळी NEVER वर क्लिक करा. Save Me म्हणजे तुमचा पासवर्ड भविष्यातील वापरासाठी save / जतन करणे, ज्यामुळे परत परत आयडी पासवर्ड टाकायची गरज नाही. 
B) तुमचे काम झाल्यानंतर logout करावे.

4)मोबाईल मध्ये suspicious App download करू नये. या App मुळे तुमच्या मोबाइल मधील data चोरला जाऊ शकतो. 
 E-Commerce वेबसाइट वापरताना खालील काळजी घ्या ज्यामुळे तुमचा ऑनलाइन :शॉपिंग चा अनुभव चांगला राहील. 

1. शॉपिंग करताना Trusted म्हणजे विश्वासपात्र E-Commerce वेबसाइट / अॅप वरूनच शॉपिंग करा. अनोळखी वेबसाइट पासून सावध रहा, प्रलोभन / ऑफर्स ला बळी पडू नका. 
2. पासवर्डस हे hack होणार नाहीत असे ठेवा. Two-Factor Authentication चालू ठेवा. 
3. Secure Connection आहे का ते पहा. 
Secure Connection कसे ओलखायचे:
 वेबसाइट चा url http:/ एवजी https:/ ने सुरू होत असेल तर ते secure कनेक्शन असते. 

Blog उपयोगी आणि चांगला वाटला असल्यास share नक्की करा.  

1 thought on “हे अँप आहे तुमच्या अतिशय कामाचे जे तुम्ही सुरु करू शकता 2 मिनटात.”

Leave a Comment