हे वजनदार शब्द वापरा तुमच्या भाषणात ज्याने तुमचे भाषण होईल प्रभावी.

खालील शब्द तुम्ही कोणत्याही भाषणात वापरू शकता, त्यामुळे तुमचे भाषण बहारदार दर्जेदार होईल.

अविश्वसनीय: Unbelievable , विश्वास बसणार नाही असे.
उदा: इतिहासात काही गोष्टी अश्या असतात ज्या आपल्याला अविश्वसनीय असतात.
आव्हान: Challenge
उदा: आपण स्वच्छता राखून रोगराईचे आव्हान थांबवू.
अकल्पित: एकाकी घडणारे, अनपेक्षितपणे घडणारे
उदा: आज श्री. अ. ब. क. यांचे इथे उपस्थित होणे अकल्पित होते.
आपद धर्म: आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला काही अश्या गोष्टी करव्या लागतात ज्या धार्मिक रित्या किंवा नीती ने बरोबर नसतात पण त्या परिस्थिति मध्ये तसे करणे भाग असते.

अष्टपैलू (Allrounder)- सर्वबाजूनी परिपूर्ण
उदा: आपले दादा म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत.

अलौकिक: extraordinary असामान्य
उदा: आपल्या राजुने MPSC परीक्षेत अलौकिक यश मिळवले आहे.
अमूल्य : ज्याचे मूल्य करता येणार नाही असे.
उदा: तुम्ही तुमचे अमूल्य योगदान देऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी हातभार लावावा.
अगणित: पुष्कळ
उदा: आपल्या जीवनात अगणित अडचणी येतात, त्यांना आपण धैर्याने सामोरे गेले पाहिजे.
आरोहण: वर चढणे
आयुध: शस्त्र
उदा: पेन हेच माझे आयुध आहे.
अभिनव: नवीन, नूतन
उदा: आज आपण एक अभिनव उपक्रम सुरू करत आहोत.

इतमाम: लवाजमा, थाट, व्यवस्था
उदा: तुम्ही या आम्ही तुमच्या स्वागताचा इतमाम सज्ज ठेवला आहे.
इच्छाशक्ती: will power
तुमची इच्छाशक्ती दृढ असेल तर तुम्ही निश्चित ध्येय नक्की गाठू शकता.
इंद्रजाल: माया, मोह
उदा: आजची तरुण पिढी समाज माध्यमांच्या इंद्राजालात अडकली आहे.

उपासक: भक्ति करणारा
उदा: मी अबक चा उपासक आहे.
उपहास: चेष्टा, थट्टा
उदा: एखाद्या व्यक्तीचा त्याच्या व्यंगावरून उपहास करणे चुकीचे आहे.

उपेक्षा : दुर्लक्षित
उदा: आज देखील ग्रामीण भाग शैक्षणिक दृष्टीने उपेक्षित आहे.

ऊर्जा / ऊर्जास्त्रोत: Energy
उदा: मित्रांच्या सोबत असण्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, ते आपले ऊर्जास्त्रोत आहेत.

कर्णमधुर: सुसंवादी
उदा: तुमचा आवाज खूप कर्णमधुर आहे.

कवडीचुंबक: अतिशय कंजूस
उदा: तो इसम अगदी कवडीचुंबक आहे, तो काय देणगी देणार.

कुपमंडूक: संकुचित दृष्टीचा
उदा: स्वतःला पुरोगामी म्हणून स्त्रीयांचे स्वातंत्र्य हिरवणारे खरे कुपमंडूक असतात.

गंडांतर: खूप मोठे / भीती दायक संकट
उदा: त्यांच्यावर गंडांतर आले आहे
गुळाचा गणपती: मंद बुद्धीचा
उदा: अबक म्हणजे गुळाचा गणपती आहे, सर्व राम भरोसे सुरू आहे.

चंचल: अस्थीर
उदा: माणसाचे मन हे चंचल असते.

टोळभैरव: नासाडी करणारा / करणारे
उदा: अबक हा टोळभैरव नेता आहे.

दातृत्व: Charity / दातृत्व म्हणजेच औदार्य / दानशूरता. दाता म्हणजे दुसर्‍याला दान देणारा.
उदा: गोरगरिबांना दान करून आपण आपले दातृत्व दाखवले पाहिजे.
दुर्धर: कठीण / सर्व प्रकारच्या हल्याचा प्रतिकार करू शकेल असा.
उदा: त्याला दुर्धर असा आजार झाला आहे, तो कोणत्याच उपचाराला जुमानत नाही.
धवल: पांढरे (White)
उदा: हा धवल रंग मनाला प्रसन्न करतो.

तृष्णा: तहान
उदा: शिक्षणाची तृष्णा कधीही न भागणारी असते.
दुर्लभ: Rare (दुर्मिळ)
उदा: आजच्या काळात माणुसकी असणारी माणस भेटणे दुर्लभ झाले आहे.

नंदनवन फुलवणे: सध्याच्या वाईट परिस्थितीपेक्षा चांगली परिस्थिती तयार निर्माण करणे.
उदा: मी आज तुम्हाला शब्द देतो की आज आपल्या गावाची जी बकाल अवस्था झाली आहे त्या जागी नंदनवन फुलवेल.

वसुंधरा: पृथ्वी
उदा: या वसुंधरेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.
वात्सल्य: प्रेम, माया, ममता
वारू: घोडा
उदा: तुमच्या विजयाचा वारू चारही दिशांनी उधळू दया.
विलक्षण: Fantastic चमत्कारिक
उदा: आजचा हा क्षण विलक्षण आहे, इथे तुमच्या सर्वांचे इतके प्रेम पाहून माझे मन भरून आले.
वाली: रक्षणकर्ता / बाजू घेऊन बोलणारा
उदा: आज गरिबांचा कोणी वाली उरला नाही.
विवंचना: चिंता
उदा: तुम्ही ज्या विवंचनेत आहात त्याचे उत्तर माझ्याकडे आहे.
वैषम्य: खेद : regret दु:खी वाटणे
उदा: मला माझ्याकडून काही चुकी झाली तर त्याचे वैषम्य मला नेहमी राहते.

परिवर्तनीय: बदल करण्यायोग्य
उदा: माणसाने नेहमी परिवर्तनीय असावे, चांगल्या गोष्टींचा अंगीकार करायला हवा.
परिपूर्ण:  पूर्णपणे निर्दोष
उदा: आपण नेहमी परिपूर्ण बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
पर्वणी: अतिशय दुर्मिळ / सुंदर योग
उदा: लोणावळ्याचा पाऊस हा पर्यटकांसाठी पर्वणी असतो.
पुण्यकर्म: पुण्याचे काम
पारदर्शकता / पारदर्शकपणा:  स्पष्टपणा
उदा: मी प्रत्येक गोष्ट अतिशय पारदर्शकपणे सर्वांसमोर ठेवत असतो.
प्रारब्ध: कर्मयोग
उदा: प्रत्येकाचा प्रारब्ध हा निश्चित आहे.
प्रारंभ: सुरवात
उदा: आज पासून मी अभ्यासाला प्रारंभ करणार आहे.

भीष्म प्रतिज्ञा: एखादी गोष्ट करण्याचा चंग बंधने / कठीण प्रतिज्ञा
उदा: मी भीष्म प्रतिज्ञा केली आहे की मी तुमच्या गावासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार म्हणजे देणार.

मृगजळ: आभासी / सत्यात नसणारे
उदा: विलासी जीवन हे एक मृगजळ आहे, ते कधीच साध्य होत नाही.
माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’!

समर / संग्राम: युद्ध
उदा: भ्रष्टाचारी लोकांशी आपले समर सुरू आहे.
संवादपूर्ण: Communicative (मोकळेपणाने बोलण्या योग्य)
उदा: घरातील वातावरण नेहमी संवादपूर्ण असायला हवे.
संस्मरणीय: आठवणीत ठेवण्या योग्य
उदा: बालपण नेहमी संस्मरणीय असते.
स्वयंशिस्त: Self Discipline
उदा: प्रत्येक मुलामध्ये स्वयंशिस्त असलीच पाहिजे.

Follow us on Facebook

शाश्वत धर्म: शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी (Permanent) धर्म
उदा: समाजसेवा करत असताना समाजासाठी मी शाश्वत धर्म नेहमी पाळेल आणि गरज पडेल तेव्हा आपद धर्म म्हणून प्रशासनाच्या विरोधी जाऊन तुमच्यासाठी काम करेल.

यथार्थ: Reality : वास्तव, खरेपणा, सत्य परिस्थिती
उदा: साहेबांनी आज येथे यथार्थ जाणीव करून दिली आपल्याला.

वरील शब्दांचा वापर करून आपण सुंदर भाषण तयार करू शकतो. हे दर्जेदार शब्द तुमच्या भाषणाला त्यातील शब्दाला वजन प्राप्त करून देतील.

उदाहारान म्हणून आपण एक छोटस भाषण तयार करून पाहू.

गुरुपौर्णिमा वरील भाषण

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते, या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता असे मानले जाते. त्यांनी महाभारत, पुराण कथा लिहल्या आहेत.

गुरूचे महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात खूप मोठे आहे.  गुरु हा अलौकिक असा मार्गदर्शक असतो. गुरूच्या असण्याने आपल्या जीवनाचे नंदनवन फुलते. गुरु आपल्याला जीवनात येणारे प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी आपल्याला सज्ज करतो.

गुरूचे महत्त्व आपल्या जीवनात अमूल्य आहे. गुरु म्हणजे एक ऊर्जास्त्रोत असतो, हा ऊर्जास्त्रोत आपल्याला आयुष्यभर ऊर्जा देत असतो. गुरूचे दातृत्व मोठे असते. गुरुची सेवा करणे ही एक पुण्यकर्म आहे. आपण नेहमी गुरूचे उपासक म्हणून राहायला हवे.

गुरुमुळे जीवनाला स्वयंशिस्त लागते. चंचल मानाला स्थिरता मिळते, विवंचनेतून मुक्तता होते. गुरुमुळे आयुष्याचे जे मृगजळ आहे त्याचे वास्तव समजून येते.

आपल्या जीवनात अनेक लोक येत असतात भेटत असतात, खूप काही शिकवून जात असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर आपल्याला गुरु भेटत असतात.

जन्मत: आई गुरु असते, थोडास मोठ झाल की आई-वडील, आजी आजोबा हे गुरु बनून खूप काही शिकवतात, ही शिकवण आयुष्यभर शिदोरी म्हणून सोबत राहते. शाळेत गेल की पहिल्यांदा घरबाहेरील कोणीतरी गुरु म्हणून आयुष्यात येत. तो गुरु आपल्या शिक्षणाची पायाभरणी करतो. याच पायावर पुढील शिकणाची इमारत उभी राहते.   

येण तारुण्यात कधी मित्र हा गुरु बनतो, हाच मित्र चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला शिकवत असतो. तारुण्यात जे गुरु मिळतात ते खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी देतात. मनुष्याला आयुष्यातील शेवटच्या क्षणा पर्यन्त गुरुची शिकवणी कमी येते.

आपण गुरूचा नेहमी आदर राखला पाहिजे. गुरु पौर्णिमेला फक्त गुरुचे पूजन न करता, प्रत्येक दिवशी गुरुची पूजा केली पाहिजे, नाम स्मरण केले पाहिजे, त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.

धन्यवाद.

1 thought on “हे वजनदार शब्द वापरा तुमच्या भाषणात ज्याने तुमचे भाषण होईल प्रभावी.”

Leave a Comment