माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’!

तुम्ही बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये सध्या एक बातमी एकली असेल की साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या रेणुकादेवी मंदिर माहुर येथे मंदिरात जो तंबूलचा विडा नैवेद्य म्हणून दाखवला जातो त्याला जीआय टॅग मिळाला आहे.

काय असतो जीआय टॅग? काय असतो तंबूलचा विडा?

साडेतीन शक्ति पीठांपैकी एक असणाऱ्या रेणुकादेवी मंदिर माहुर येथे (Renuka Devi Mahurgad) विडा तंबूलचे अतिशय महत्व असते, देवीच्या प्रमुख नैवेद्यापैकी एक नैवेद्य हा विडा तांबूल आहे.
देश-विदेशातून येणारे देवीचे भक्त हा तांबूल प्रसाद म्हणून आवडीने घेतात. या विशिष्ट तांबूलला आता जीआय टॅग मिळाला आहे आणि या मुळे महुरगडाला आता वेगळी ओळख मिळणार आहे.

कसा बनवतात हा विडा?

या तंबूलमध्ये नागवेलीची पाने, कात, चुना, सोप, लवंग, विलायची, सुपारी, जायफळ, धनादळ, जायपत्री, ओवा, आसमान तारा, जेष्ठ मध, चमनबार या सर्व औषधी गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा वापर केला जातो. तुम्हाला आयुर्वेदा मध्ये वरील प्रत्येक पदार्थांचे विशिष्ट औषधी गुणधर्म दिसून येतील. त्यामुळं आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत होत असते.

विडयाचे पान कुठून येते?

विडयसाठी लागणारी पाने ही उमरखेड (यवतमाळ) येथील विडूळ, आदिलाबाद जिल्हा (तेलंगण) तसेच गुंडवळ व लांजी येथून येतात.

GI Tag म्हणजे काय?

G I Tag चा full form हा Geographical Indication Tag असा होतो. याचा शब्दशः अर्थ हा भौगोलिक संकेत असा होतो. सध्या सोप्या शब्दात सांगायच म्हटल तर.

जीआय टॅग हा अश्या गोष्टीला दिला जातो, जी वस्तु एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात उत्पादित (तयार केली जाते.) केली जाते  आणि त्यासाठी तेथील लोकांचे कौशल्य खूप मोलाचे असते. हे कौशल्य तेथील लोकाना वंशपरंपरेने प्राप्त झालेल असते.

जीआय(GI) टॅग चा उद्देश हा त्या ठिकाणच्या unique quality(विशिष्ट गुण, दर्जा), त्या गोष्टीमुळे त्या ठिकाणाला प्राप्त झालेले महत्त्व आणि तो पदार्थ किंवा वस्तु तयार करण्यासाठी लागणारे skill (जे परंपरेने चालत आलेले आहे.) याचे संवर्धन रक्षण करणे हे आहे.

जेव्हा एखाद्या उत्पादनाला GI टॅग दिला जातो, तेव्हा ते असे सूचित करते की त्याच्याकडे विशिष्ट गुण, वैशिष्ट्ये किंवा प्रतिष्ठा आहे जी मूलत: त्याच्या भौगोलिक उत्पत्तीला कारणीभूत आहे. हे गुण नैसर्गिक वातावरण, पारंपारिक ज्ञान, विशिष्ट उत्पादन तंत्र किंवा प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित असू शकतात.
What is GI Tag in Marathi?

जीआय टॅग मुळे काय फायदा होतो?

जीआय टॅग हा त्या विशिष्ट उत्पादनाला कायदेशीर संरक्षण प्रदण करतो. यामुळे producer (उत्पादक) ला एकप्रकारे त्याचे उत्पादन हे कोणीही कॉपी करणार नाही याची खात्री मिळते. यामुळे त्या गोष्टीचा गैरवापर, नकली वस्तु किंवा इतर ठिकाणी तयार होणारी वस्तु तिथिल नावाने कोणी विकू शकत नाही. यामुळे पारंपरिक उत्पादकांना एकप्रकारे संरक्षण प्राप्त होते आणि त्यांचे प्रॉडक्ट हे योग्य किंमती मध्ये विकले जाते.

हे सरकारी अॅप आहे तुमच्या एकदम कामाचे

महाराष्ट्रात आणखी कोणत्या गोष्टीन हा टॅग मिळाला आहे?

1. नागपूरचे संत्री: Nagpur Orange म्हणजेच नागपुरी संत्री यांना त्यातील वेगळी गोड चव आणि त्यामधून निघणारा जास्त रस यासाठी 2014 मध्ये GI Tag मिळाला आहे.
2. कोल्हापुरी चप्पल: कोल्हापूर चप्पल हा मराठी माणसाच्या lifestyle चा अविभाज्य भाग आहे. याच कोल्हापूर चप्पल ला तिच्या हस्तकला, वेगवेगळ्या डिझाईन, तिचा टिकाऊपणा आणि त्यासाठी जे स्थानिक मटेरियल वापरल जात यासाठी 2007 मध्ये जीआय टॅग मिळाला आहे.
3. नाशिकचे द्राक्ष: नाशिकची द्राक्ष आणि winery आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहेत. नाशिक परिसर हा द्राक्ष उत्पादनासाठी जगभरात नावारुपाला आला आहे. नाशिक चे द्राक्ष त्याची चव आणि गुणवत्ता यासाठी प्रसिद्ध आहेत. 2007 साली या द्राक्षणा जीआय टॅग मिळाला आहे.
4. Solapur Terry Towel: सोलपुरी टॉवेल ला त्याच्या पाणी शोषून घेण्याची क्षमता, मऊपणा आणि टिकावूपणा यासाठी 2015 साली जीआय टॅग मिळाला आहे.
5. पैठणी साडी: पैठणी साडी म्हणजे मराठी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. हीच सर्वांची पैठणी साडी जीआय टॅग प्राप्त आहे. या पैठणी साडी त्यांची हस्तकला, वेगवेगळे आणि क्लिष्ट डिझाईन, आकृतिबंध विणकाम यासाठी प्रसिद्ध आहेत. 2000 साली जीआय टॅग मिळाला.
6. वारली पेंटिंग: वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील वारली जमातीतून उद्भवलेली आदिवासी कला आहे. वारली चित्रकलेची विशेषतः तिच्या साधेपणात, monochromatic म्हणजे फक्त एकच रंग वापरुन चित्र काढणे आणि geometric designs म्हणजे चौकोन, त्रिकोण, वर्तुळ इत्यादि च्या वापर करून चित्र काढणे यात आहे. वारली पेंटिंग ही महाराष्ट्र, गुजरात, दादरा, नगरहवेली, दमनदिव इत्यादि ठिकाणी आढळते.
7. पुणेरी पगडी: पुणेरी पगडीचा उगम हा पेशवाई च्या काळात झाला. न्यायमूर्ती रानडे, गो. ग. आगरकर, लोकमान्य टिळक, गो. कृ. गोखले इत्यादि विद्वान व्यक्ती ही पुणेरी पगडी घालायचे.  पुणेरी पगडीला पेशवाई पासून मानाचे स्थान आहे. 2009 रोजी पुणेरी पगडीला जीआय टॅग मिळाला व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.
8. Purandar Fig म्हणजेच पुरंदर चे अंजीर: अरबस्तानातून पुरंदर ला आलेल्या अंजिरला आज खूप मागणी आहे. 2016 मध्ये जीआय टॅग मिळाला या अंजिराला.
9. नाशिक वाईन (Nashik valley wine): Nashik Valley Wine नावाने नाशिक ची wine जीआय टॅग अंतर्गत संरक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ 52 wineries मध्ये wine बनवण्याचे काम चालते.
10. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी: भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पन्ना पैकी 85% स्ट्रॉबेरी महाबळेश्वर परिसरातून येते. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी ला 2010 मध्ये जीआय टॅग मिळाला आहे.
11. कोल्हापूरचा गूळ: कोल्हापूरी चप्पल सोबतच कोल्हापूरच्या गुळाला देखील जीआय टॅग मिळालेला आहे. 2021 मध्ये हा जीआय टॅग मिळाला आहे.
12. आजरा घनसळ तांदूळ: आजारा हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे, येथील तांदूळ हा त्याच्या सुवासासाठी प्रसिद्ध आहे.
13. सांगलीचे मनुके: नाशिकचे द्राक्ष जरी प्रसिद्ध असले तरीही मनुके मात्र सांगलीचे प्रसिद्ध आहेत.
14. कोकणचा हापूस: कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील हापूस जगप्रसिद्ध आहे. 2018 मध्ये या हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला.
15. मराठवाड्याचा केसर आंबा: कोकणच्या आंब्याला टक्कर देणारा मराठवाड्याचा  केसर आंबा देखील सुप्रसिद्ध आहे. 2021 मध्ये जीआय टॅग मिळाला आहे.
16. मिरची – भिवापुर: नागपूरचा संत्रीच नाहीतर भिवापुरी मिरची देखील जीआय टॅग प्राप्त आहे.
17. केळी – जळगाव: जळगाव खाणदेश च्या केळी ला 2016 साली जीआय मानांकन मिळाले आहे. भारत हा जागतिक स्तरावर एक नंबरचा केळी निर्यात करणारा देश आहे.
18. चिकू – घोलवड-डहाणू:
डहाणू हा पालघर या जिल्ह्यातील एक तालुका आहे. डहाणू तालुक्यात बाराही महीने उत्कृष्ट चिकूचे उत्पन्न घेतले जाते.
19. डाळिंब सोलापूर:
सोलापूर जसे ज्वारीचे कोठार आहे तसेच ते येथील डाळिंबासाठी देखील प्रसिद्ध आहे. विविध औषधी गुणांनी युक्त असे हे डाळिंब विशेष दर्जा व गुणप्राप्त झाले आहे. 2021 साली जी आय मानांकन मिळाले आहे.
20. सीताफळ – बीड: बीडच्या बालाघाट डोंगर रांगामध्ये उगवणारी सीताफळ प्रसिद्ध आहेत. बीडचा हा रानमेवा आता जीआय टॅग मिळाल्यामुळे जगभर पोहचला आहे.
21. मोसंबी – जालना: जालना जिल्हा हा मोसंबीचे आगर म्हणून ओळखला जातो.
22. आंबेमोहर तांदूळ: सुवासिक व चवदार असा आंबेमोहर तांदूळ हा पश्चिम घाटाची ओळख आहे. पुणे जिल्ह्यातील मुळाशी तालुक्यात आंबेमोहर चे लक्षणीय उत्पन्न घेतले जायचे पण सध्या हे उत्पन्न कमी झाले आहे.
23. वाघ्या घेवडा: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव चा घेवडा हा जीआय ने सन्मानित आहे.  
24. तूर डाळ नवापुर: नवापुर (नंदुरबार) तालुका देशी तुरीसाठी प्रसिद्ध आहे. नवापुर हा आदिवासीबहुल आणि डोंगराळ प्रदेश आहे.
सोलापूर चादर, मंगळवेढा (सोलापूर) ची ज्वारी, लासलगाव कांदा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे कोकम, वेंगुर्ल्याचे काजू, सांगलीची हळद, वायगाव हळद (वर्धा जिल्हा, विदर्भ), जाळगावचे भरीत आणि वांगी हे देखील जीआय टॅग प्राप्त आहेत.
जीआय टॅग हा 10 वर्ष valid असतो त्यांतर परत त्याचे शुल्क फरून renew करावे लागते.

संपूर्ण भारतातील जीआय टॅग प्राप्त गोष्टींची यादी पहा इथे.

2 thoughts on “माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’!”

Leave a Comment