‘विलोमपद’ म्हणजे काय? ‘Vilompad’ definition Marathi.

विलोमपद म्हणजे असे वाक्य / शब्दरचना / वाक्प्रचार, शब्द किंवा अंक जे उलटे वाचले तरी तसेच राहते आणि त्याचा अर्थ देखील बदलत नाही. इंग्रजी मध्ये विलोमपदाला Palindrome असे म्हणतात. इंग्रजीत पुष्कळ  Palindrome वाक्य बघायला मिळतात पण मराठी भाषेत काही मोजकेच विलोमपदे आहेत.
उदा:
शब्द: काका, मामा, Dad
वाक्य: चिमा काय कामाची, Race caR
अंक: 123321

A palindrome is a sentence / phrase / phrase, word or number that remains the same even when read backwards and does not change its meaning. Many palindrome sentences are seen in English but Marathi language has few antonyms.

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना असते.

खाली काही विलोमपदाची काही उदाहरणे दिली आहेत.

 1. चिमा काय कामाची
 2. भाऊ तळ्यात ऊभा
 3. रामाला भाला मारा
 4. काका, वाचवा, काका
 5. काका, वाहवा ! काका
 6. ती होडी जाडी होती
 7. तो कवी डालडा विकतो
 8. तो कवी मोमो विकतो
 9. तो कवी सामोसा विकतो
 10. तो कवी कोको विकतो
 11. तो कवी वामाला मावा विकतो
 12. तो कवी कणिक विकतो
 13. मराठी राम
 14. टेप आणा आपटे
 15. शिवाजी लढेल जीवाशी
 16. सर जाताना प्या ना ताजा रस
 17. हाच तो चहा
  विलोमपद म्हणजे काय?

मराठी व्याकरण

भाषेचे पाच मूलभूत घटक  आहेत, अक्षर, शब्द, वर्ण, वाक्य आणि व्याकरण.
कुठल्याही भाषेची सुरवात होते ती अक्षरांपासून, ही अक्षरे विशिष्ट क्रमाने समूहात येतात तेव्हा त्या अक्षरांना एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, त्या अक्षरांच्या समूहाला शब्द शब्द म्हणतात.  
शब्द: आपण वाचले की अक्षरांच्या विशिष्ट समूहाला शब्द असे म्हणतात. शब्द म्हणजे एखाद्या कल्पनेचा वस्तूचा दर्शक शब्द समुह, ज्यामुळे ती भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होत असतो. 
उदा: आई, इमारत, कमळ इत्यादि.
शब्दाचे वापरानुसार आणि शब्दांच्या निर्मितीनुसार पुढील प्रकार प्राप्त होतात.

वापरानुसार शब्दाचे खालील प्रकार पडतात.
अ) नाम
ब) सर्वनाम
क) विशेषण
ड) क्रियाविशेषण

अ. नाम:

एखाद्या प्राणी, वस्तू किंवा काल्पनिक गोष्टी च्या नावाला नाम असे म्हणतात. हा एक असा  शब्द आहे जो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करतो, जसे की सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.नाम असे शब्द आहेत जे लेख आणि गुणविशेषण विशेषणांसह उद्भवू शकतात आणि संज्ञा वाक्यांशाचे प्रमुख म्हणून कार्य करू शकतात.

नामाचे सामान्यपणे खालील प्रकार पडतात.
सामान्य नाम
विशेष नाम
भाववाचक नाम

 1. सामान्य नाम:
  सामान्य नामाच्या आपण खालील व्याख्या एकली असेल
  एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय.
  सोप्या भाषेत सांगायचे झाले तर खूप साऱ्या गोष्टी ज्या एकाच जातीच्या आहेत आणि एकसारख्या वैशिष्ट्या मुळे एक वेगळा गट बनवतात आणि आपण त्या गटाला किंवा समूहाला जे नाव देतो त्याला सामान्य नाम असे म्हणतात.
  सामान्य नाम हे जातिवाचक असते आणि बहुदा ते अनेकवचनी असते.
  उदा: मुलगा, मुलगी (ही दोन सामान्य नाम आहेत आणि हे मानव या समान जातीतून आहेत.)
  आणखी काही उदाहरणे पाहूया.
  घर, शाळा, नदी, पर्वत, मांजर, शिक्षक, शेतकरी
 2. विशेष नाम:
  ज्या नावातून विशिष्ट वस्तु / व्यक्ति / प्राणी अश्या सजातीय गोष्टीचा बोध होतो त्याला विशेषनाम असे म्हणतात.
  विशेषनाम हे व्यक्तीवाचक असते म्हणजे विशेषनाम मधून जातीच्या / प्रकाराचा / समूहाचा बोध न होता त्या जातीतील विशिष्ट एकाच अर्थबोध होतो.
  विशेषनाम हे व्यक्तीवाचक असल्या कारणाने ते एक वचन असते, त्याचे अनेक वचन होत नाही.
  उदा: राम, शाम, आदित्य, अद्विक (मुले)
  सिता, गीता, अदिती, अश्विनी (मुली)
  गाय, बैल, हरिण, गाढव (प्राणी)
  गोदावरी, गंगा, यमुना (नद्या)
  सह्याद्री, बालाघाट, विंध्य (पर्वत) इत्यादि.
 3. भाववाचक नाम:
  ज्या नामामुळे एखाद्या वस्तु / प्राणी / व्यक्ति मधील गुण / धर्म / भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात.
  उदा: चांगला, वाईट, आनंद, अहंकार, दुख:, ईर्षा, राग, मायाळू, जिद्दी इत्यादि.

मराठी वाक्प्रचार

ब) सर्वनाम:

सर्वनाम म्हणजे जेव्हा नामाच्या एवजी इतर शब्द वापरला जातो तेव्हा त्याला सर्वनाम म्हणतात.
एका वाक्यात नाम सतत आले तर ते एकायला आणि लिहायला देखील व्यवस्थित वाटत नाही. नामाचा हाच वारंवार येणार पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ठिकाणी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात.
उदा: मी, तो, ती, तुम्ही, आपण, कोण, हा इत्यादि.

सर्वनामाला स्वतःचा असा अर्थ नसतो. ते ज्या नामाच्या एवजी आलेले असतात त्याचा अर्थ त्याला प्राप्त होत असतो. वाक्यात / परिच्छेदात नाम येऊन गेल्या शिवाय सर्वनाम वापरता येत नाही कारण त्यामुळे एकणाऱ्याला / वाचणाऱ्याला त्याचा अर्थ प्राप्त होणार नाही. सर्वनाम हे नामाचे प्रतिनिधित्व करते आणि नामाचे सर्व कार्य सर्वनाम बाजवते.
सर्वनाम हे संजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तूला वापरता येते.
उदा:
अ) राम शाळेत जातो, तो हुशार आहे.
येथे ‘राम’ हे नाम आहे आणि उर्वरित वाक्यात ‘तो’ हे सर्वनाम वापरले आहे.
ब) तो टेबल, ती खुर्ची, हा आरसा

सर्वनामाचे देखील काही उपप्रकार पडतात. एकूण सहा प्रकार आहेत
1) पुरुषवाचक सर्वनाम
2) दर्शक सर्वनाम
3) संबंधी सर्वनाम
4) प्रश्नार्थक सर्वनाम
5) सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
6) आत्मवाचक सर्वनाम

आगळ्या वेगळ्या मराठी म्हणीचा अभ्यास करण्यासाठी येथे क्लिक करा.

क) विशेषण

नामबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणले जाते. ज्याच्या बद्दल ही विशेष माहिती सांगितली जात आहे त्याला विशेष्य असे म्हटले जाते.
उदा: उत्तम लेखक, प्रामाणिक कुत्रा, सात टोप्या, काळी म्हैस इत्यादि.
यात उत्तम, प्रामाणिक, काळी हे विशेषण आहेत आणि लेखक, कुत्रा, टोप्या, म्हैस हे विशेष्य आहेत.

विशेषणाचे खालील प्रमाणे प्रकार पडतात.

गुणवाचक विशेषण
संख्यावाचक विशेषण
सर्वनाम विशेषण

 1. गुणवाचक विशेषण
  नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण अथवा विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण म्हणतात.
  उदा: हिरवेगार शेत, पांढरा शुभ्र ससा, शांत मुलगा
  वरील उदाहरणात हिरवेगार, पांढरा शुभ्र, शांत हे गुणविशेषणाचे प्रकार आहेत.
 2. संख्यावाचक विशेषण:
  ज्या विशेषणाने एखाद्या नामाचे संख्या दर्शवली जाते त्यास संख्यावाचक विशेषण म्हणतात.
  त्याचे खालील प्रकार पडतात.

  गणनावाचक विशेषण
  (पूर्णांक आणि अपूर्णांक असे दोन प्रकार पडतात.)
  उदा: पूर्णांक: एक कार, दोन सायकली
  अपूर्णांक: सव्वा रुपया, दीड किलो, अर्धा तास

  क्रमवाचक विशेषण
  उदा: पहिलं नंबर, दूसरा मुलगा, सातवा बंगला, तिसरे दुकान

  आवृत्तीवाचक विशेषण
  दुप्पट लांब, दुहेरी रंग, तिप्पट माणस

  पृथ्वकत्ववाचक विशेषण
  उदा
  : तीन-तीनच गट करा, चार-चार लोकांची टीम करा, दोन-दोन ची जोडी करा.
  अनिश्चित संख्या विशेषण
  उदा: काही जागा, भरपूर गर्दी, थोडी थंडी, पुष्कळ मुले इत्यादि.
 3. क्रियाविशेषण:
  जो शब्द एखाद्या क्रिये विशेष माहिती देत असतो त्याला क्रिया विशेषण असे म्हटले जाते. क्रियापद बद्दल विशेष माहिती देणार काही शब्द असतात त्याला क्रियाविशेषण असे म्हटले जाते.
  उदा: 1) कुंभकर्ण अधशासारखा खात होता.
  2) अनिलने लगबगीने दुकान बंद केले.
  3) आज जोरदार वारा आला.
  4) वैशाली चांगली मुलगी आहे.
  वरील वाक्यांमध्ये अधशासारखा, लगबगीने, जोरदार, चांगली हे काही क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत.

  क्रियाविशेषणाचे खालील प्रमाणे प्रकार पडतात.
  कालवाचक: उदा: आज, उद्या, परवा, नेहमी, पूर्वी, अचानक, आता, तेव्हा इत्यादि
  स्थलवाचक: इथे, तिथे, इकडे, चोहीकडे, जवळ इत्यादि.
  रितीवाचक: (क्रिया कशी घडत आहे हे दर्शवतात.)
  उदा: शाम ने गटागटा पाणी पिले.

  संख्यावाचक / परिणाम वाचक: हे अव्यय क्रिया किती वेळ घडली किंवा क्रियेचा परिणाम काय झाला हे दर्शवतात.
  उदा: किंचित लांब, जरा गोड
  प्रश्नार्थक: जो शब्द वाक्याला प्रश्नार्थक बनवतो त्याला प्रश्नार्थक क्रिया विशेषण म्हणतात.
  उदा: तुम्ही जेवालना?

आणखी मराठी व्याकरणा बद्दल वाचत राहण्यासाठी भेत देत रहा, शेयर करा, कमेंट करा. 
Follow us on Instagram DostMaza

Leave a Comment