Say GOODBYE to these things before welcoming the New Year

नववर्षाच्या स्वागत करण्याआधी आणि नवीन संकल्प करण्या आधी या सवयींना करा बाय बाय.

आपण सर्वजण नाव वर्षाचे स्वागत हे अतिशय उत्साहाने, उर्जेने आणि नव नवीन संकल्पानी करत असतो. सरत्या वर्षाला निरोप देताना आपण या वर्षात काय चांगले केले, काय कमावले, झालेल्या चुका, चुकलेले निर्णय यांचे पुनरावलोकन करत असतो. झालेल्या चुकांमधून चुकलेल्या निर्णयामधून धडे घेऊन पुढे जात असतो.

अश्याच काही चुका किंवा सवयी आपण 2023 मध्ये मागे सोडून नवीन वर्षात नवे संकल्प करून पुढे जवूया. (Let’s move forward with new resolutions in the new year.)

अनेकजन वर्षभरात अनेक वाईट सवयींच्या (Bad habits) आहारी जातात. त्यामुळे त्यांचे मानसिक (Mental) आणि शारीरिक (physical) अश्या दोन्ही गोष्टींचे नुकसान होत असते. जर तुम्हाला निरोगी राहून नवीन वर्षाची सुरवात करायची आहे आणि येणारे वर्ष हे आनंदात आणि निरोगी घालायचे आहे तर आजच या सवयींना गुड बाय म्हणा. कारण या सवयी तुमच आणि तुमच्या परिवाराचे सर्व दृष्टीने नुकसान करत असतात.

बऱ्याच लोकांना या वाईट सवयी नेमक्या कोणत्या आहेत हेच कळत नाही, आणि आपण त्या सवयींच्या आहारी गेलो अहोत हे लक्षात येत नाही. वेळीच या सवयी ओळखा आणि त्यापासून दूर व्हा.
वाईट सवयी म्हणजे दारू पिणे (Drinking), जुगार खेळणे (gambling), धूम्रपान (Smoking) करणे असे नाही तर आणखी देखील बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी हानिकारक असू शकतात. त्या काय आहेत हे आपण पाहूया.

How to welcome new year? What resolutions should be made in the new year?

सतत खात राहणे (Constant eating)

सतत तोंड चालू ठेवणे किंवा खवय्ये गिरीच्या (Gourmet) नावाने काहीतरी खात राहणे. नवीन पदार्थांची चव चाखणे काही वाईट नाही पण त्याला मर्यादा असावी. जे खाद्य पदार्थ आपण खात आहोत ते आपल्या पोटाला आणि तब्येतील सहन होतील का याचा विचार करावा.

नवीन खाद्य पदार्थ खाताना ‘कधी नाही पाहण्यात ते आल खाण्यात’ या उक्ती प्रमाणे वागू नये. आज काल जंक फूड (Junk Food), Ready to Eat Food (म्हणजे पाकीट फोडा आणि गरम पाण्यात टाका, पदार्थ तयार), Street Food (रस्त्यावरील खाद्यपदार्थ) हे खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, त्यावर मर्यादा हवी. असे पदार्थ पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा खाल्ले तर ठीक आहे.

जे आपण नेहमी हे पदार्थ खात असाल तर अनेक आजारांना तुम्ही आमंत्रण देत आहात. तर संकल्प करा आणि सतत खात राहण्याची सवय सोडा. (Make a resolution and break the habit of constant eating.)

अपूर्ण झोप (Incomplete sleep):

धावपळीचे जग आणि बदलते कामाचे स्वरूप यामुळे झोप अपूर्ण राहते किंवा कामाच्या वेळेमुळे रात्री काम आणि दिवस झोप अश्या पद्धतीची जीवनशैली (Life Style) बऱ्याच लोकांची झाली आहे.

रात्री काम आणि दिवसा झोप हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. रात्री उशिरा पर्यन्त जागरण करणे आणि दिवसा उशिरा पर्यन्त झोपणे हे देखील शरीरसाठी अपायकारक (Harmful) आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यन्त जागे न राहते लवकर झोपून लवकर उठण्याचा संकल्प करा.
लक्षात ठेवा ‘लवकर झोपे लवकर उठे त्यास आरोग्य-ज्ञान-संपत्ती भेटे’.
(who sleeps early and wakes up early may receive health-knowledge-wealth)

व्यायाम आणि शारीरिक कामाला टाळाटाळ करणे.

बैठ्या कामामुळे (sitting work) शारीरिक हालचाल कमी झाली आहे. शारीरिक हालचाल नसल्यामुळे लठ्ठ पणा, शरीर दुखणे, स्नायू वेदना, मधुमेह असे आजार बळावू शकतात. यातुन अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. या गोष्टी वेळीच टाळायच्या असतील तर नववर्षात व्यायाम करायला सुरवात करा.
जिम ला जाणे शक्य नसेल तर घरीच व्यायाम करा, घरातील शारीरिक कष्टाची काम स्वतः करा आणि दररोज किमान अर्धा तास चला. याने तुमचे शरीर तर तंदुरस्त राहिलच त्यासोबत मन देखील प्रसन्न राहील.

सोशल मीडियाचा अति वापर:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) वरील वेळेवर मर्यादा घाला. सोशल मीडियाच्या सतत संपर्कामुळे अपुरेपणाची भावना निर्माण होते आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक मानसिक नुकसान होतेच पण बऱ्याच वेळा वायक्तिक व्यावसायिक संबंध देखील खराब होत असतात.

छंदांकडे दुर्लक्ष करने

तुम्हाला आवडणाऱ्या छंदासाठी वेळ काढा. छंद हा आराम करण्याचा, सर्जनशीलता व्यक्त करण्याचा आणि कामाच्या बाहेर किंवा नियमित कामांच्या व्यापातून तनाव मुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे. आपल्या छंद आणि गोष्टींना जपा.

धूम्रपान मद्यपान टाळा (Avoid smoking and drinking)

आजच्या आयटीच्या (Information Technology) जगात धूम्रपान आणि मद्यपान हे अतिशय सर्वसामान्य झालेले आहे. धूम्रपणामुळे कर्करोग (Cancer) / विविध श्वसणाचे आजार होऊ शकतात. मद्याचे सेवन देखील शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे या गोष्टी मर्यादेत ठेवा. 

स्क्रीन टाइम कमी करा (Reduce screen time)

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात (In the age of technology) मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅब (Tab) शिवाय आपला एक मिनिट देखील जात नाही.
जास्त वेळ स्क्रीन (Screen) वर बघितल्याने डोळ्यांवर परिणाम होतोच पण त्यासोबत आपल्या मानसिक स्‍वास्‍थ्‍यावर (Mental Health) देखील नकारात्मक परिणाम होत असतात.

आपण Screen time टळू तर शकत नाही पण कमी नक्कीच करू शकतो. फावल्या वेळेत (in spare time) रील्स (Reels) बघण्या पेक्षा एखादे पुस्तक वाचा किंवा आपल्या प्रियजनांन सोबत संवाद करा.

Overcommitting: (जास्तीची वचने)

काही ठिकाणी नाही म्हणायला शिका, Overcommitment टाळा. आपल्याकडून जय गोष्टीं होऊ शकता नाहीत त्याचे वचन देऊ नका.

कामात विलंब

कामांना उशीर केल्याने अनेकदा तणाव वाढतो आणि शेवटच्या क्षणी गोंधळ होतो. कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा आणि कामे त्वरित पूर्ण करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. उद्या काम करायचे आहे तर आज काय वाईट या भावनेने काम करा.

अनावश्यक खर्च टाळा (Avoid unnecessary expenses):

मित्र फिरायला चाललेत म्हणून आपण देखील जाऊ, मित्राने बाइक (Bike) घेतली म्हणून आपण पण घेऊ किंवा नवीन मोबाइल बाजारात आला की तो लगेच विकत घेणे. या गोष्टी टाळा. आजची बचत उद्याची गुंतवणूक असते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. खरंच एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल तरच तीची खरेदी करा.
(Buy something only if you really need it.)

मानसिक आरोग्य कडे दुर्लक्ष करणे. (Ignoring mental health)

आपण बऱ्याचदा शारीरिक आरोग्यकडे लक्ष देतो पण मानसिक आरोग्या कडे आपले दुर्लक्ष होते. मानसिक आरोग्य देखील शारीरिक आरोग्य इतकेच महत्त्वाचे आहे. Mental health कडे देखील योग्य लक्ष दया. Meditation करा, योगा करा, आपल्या लोकांशी मनमोकळ बोला. विचारांना साठवून न ठेवता मोकळ करा.

व्यक्तिमत्व विकासाकडे दुर्लक्ष (Neglect of personality development)

Personal Development कडे दुर्लक्ष करणे टाळा. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने नवनवीन गोष्टी शिकत रहा, पुस्तके वाचा वेगवेगळ्या कार्यशाळा (Workshops) मध्ये सहभागी व्हा.

गॉसिपिंग (गप्पा)

गॉसिपमध्ये गुंतल्याने नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते आणि नातेसंबंध खराब होऊ शकतात. सकारात्मक संभाषणांवर लक्ष केंद्रित करा आणि अफवा पसरवणे टाळा.

या पैकी काही सवयी जर तुम्हाला देखील असतील तर तुम्ही यावर गंभीर विचार करायची गरज आहे. आज जरीही तुम्हाला याचे परिणाम दिसत नसले तर भविष्यात याचे गंभीर दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा, स्वत: मध्ये सकारात्मक बदल घडवून आना.

आणि हा बदल घडवण्यासाठी तुम्ही जर तयार असाल तर नवीन वर्षाचा मुहूर्त अति उत्तम आहे.

तुम्हाला नववर्षाभिनंदन! तुमचे येणारे वर्ष हे सुख समृद्धी आणि आरोग्यामय जावो ही प्रार्थना.

Our_Facebook_Page
Our Instagram Page

Leave a Comment