How should your diet be in a changing environment?

बदलत्या वातावरणात असा असावा तुमचा आहार.

उन्हाळा आला की आहारात बरेचशे बदल करावे लागतात, ते कोणते हे आपण समजून घेऊया.
Summer Season Diet plan for kids, summer season diet plan for older people

उन्हाळा ऋतु मध्ये तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत असते. अश्या या वातावरणात शरीरात dehydration (निर्जलीकरण) चे प्रमाण प्रचंड वाढते. उन्हाळ्यातील आरोग्य समस्यांपासून दूर राहण्यासाठी, स्वस्थ राहण्यासाठी आहारात काही बदल करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात हंगामी फळे, पलेभाज्यांचा समावेश करणे गरजेचे असते. ज्यामुळे आपण अने क आरोग्य समस्यांपासून दूर राहतो.

How should your diet be in a changing environment?

फळे:

उन्हाळा म्हंटल की विविध फळांची मेजवणीच म्हणायच. कलिंगड, खरबूज, आंबा, द्राक्ष, काकडी अशी विविध फळ या ऋतुमध्ये बघायला मिळतात. यापैकी उन्हाळ्यात दररोज एक तरी फळ खावे. या फळांमधून शरीरसाठी आवश्यक पोषक घटक तर मिळतातच त्यासोबतच शरीराची पाण्याची गरज देखील भागते.

उन्हाळ्यात लिंबूपाणी, नारळपाणी, कैरीपन्हे देखील नियमित घेत राहणे उत्तम आहे.
(fruits commonly enjoyed in Maharashtra during the summer season).

डिहायड्राशन: (Dehydration)

उन्हाळा म्हंटल की सर्वात आधी शब्द येतो तो म्हणजे डिहायड्राशन. डिहायड्राशन म्हणजे काय तर शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर उष्माघात होऊ शकतो, आपण आजारी पडू शकतो.
त्यामुळे उन्हाळ्यात लिंबूपाणी, नारळपाणी, कैरीपन्हे, लस्सी, कोकम सरबत नियमित घेत राहणे उत्तम आहे. उन्हामध्ये शक्यतो घराबाहेर पडू नये आणि बाहेर जाण्याची वेळ आली तर शरीरातील पाणी पातळी जास्त राहील याची काळजी घ्या. घराबाहेर पडताना पाणी बॉटल सोबत असू दया. ज्यामुळे डिहायड्राशन समस्या होणार नाही.

उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे टाळा.

  • उन्हाळ्यात मसालेदार आणि जास्त तिखट खाणे टाळा.
  • तेलकट / तेलात तळलेले, शिळे झालेले पदार्थ खाऊ नयेत.
  • सध्याचा काळ जारी Ready to eat आणि पॅकेजिंग पदार्थांचा असाल तरी असे पदार्थ आरोग्यासाठी घटक ठरू शकतात, त्यामुळे ते खाणे टाळा.

(Avoid eating these foods in summer.)

उष्माघात झाला हे कसे ओळखावे.

(How to recognize heat stroke.)

Heat Wave किंवा उष्णतेची लाट ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्तीच आहे.

उष्माघात ही एक अति गंभीर आणि संभाव्य जीवघेणी स्थिती आहे. जेव्हा आपल्या शरीराचे तापमान सामान्य पातळीपेक्षा अधिक वाढते तेव्हा हि परिस्थिती उद्भवते (सामान्यतः 104°F किंवा 40°C वर). हि परिस्थिती उद्भवण्यामागचे कारण म्हणजे दीर्घ काळापर्यंत उन्हात (उच्च तापमानात) राहणे, उष्ण / दमट वातावरणामध्ये शारीरिक श्रम करणे आहे. हि एक गंभीर आणि जीवघेणी बाब आहे आणि यावर तत्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता आहे.

लक्षणे: (symptoms)

  • शरीराचे उच्च तापमान (सामान्यतः 104°F किंवा 40°C पेक्षा जास्त होते).
  • उष्ण आणि कोरडी त्वचा (Dry skin) पडणे.
  • हृदयाचे ठोके वाढणे. (Increased heart rate.)
  • डोकेदुखी होणे (headache)
  • चक्कर येणे (Dizziness) / गरगरणे (डोळ्याना अस्पष्ट दिसणे.)
  • मळमळ होणे (nausea) आणि उलटी होणे (Vomiting).
  • मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होणे. (काहीच न सुचणे किंवा आपण बधिर होणे असे देखील म्हणतो).  
  • बेशुद्ध पडणे / बेशुद्ध होणे (fainting).

उष्माघातापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी.

(How to take care to avoid heat stroke.)

उष्माघात ही एक गंभीर आणि जीवघेणी स्थिति आहे, त्यावर तत्काळ आणि योग्य उपचार होणे गरजेचे आहे.

  1. पाणी पित रहा (Keep drinking water): तहान असो असेल किंवा तुम्हाला तहान नसेल पाणी पित रहा. शरीराची पाणी पातळी कायम ठेवा.
    stay hydrated. बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत बाळगा.
  2. उन्हात जाणे टाळा: खूपच  आवश्यक असेल तरच उन्हामध्ये बाहेर पडा, बाहेर जाताना छत्री सोबत ठेवा. (सकाळी 11 ते 5 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.)
  3. पोशाख (Cloths): उन्हाळ्यात योग्य कपडे घाला. हलके, सैल, फिकट रंगाचे आणि सूती कपडे घाला. घट्ट आणि जाड कपडे घालणे टाळावे.
  4. मधुमेह (Diabetes) किंवा रक्तदाब (blood pressure) या सारखा जर आजार तुम्हाला असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्याने योग्य ती काळजी घ्या.
  5. बाहेरून आल्या नंतर लगेचच थंड पाणी पिणे टाळा (Avoid drinking cold water), सुरवातीला साधे पाणी घ्या आणि 10 / 12 मिनिटे झाल्यावर मग थंड पाणी / शरबत घ्या.
  6. उन्हा मधून आल्या नंतर थंड पाणी डोक्यावर घेऊ नका.
  7. जास्त कष्टाची कामे सकाळी आणि संध्याकाळी करा.
  8. धूम्रपान (Smoking) आणि मद्यपान (drinking) करू नका.
  9. उन्हामध्ये पार्क केलेल्या बंद गाडीत जास्त वेळ बसु नका आणि लहान मुलांना बंद गाडीत ठेऊ नका. 
  10. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास वेळीच योग्य उपचार घ्या, लक्षांकडे दुर्लक्ष करू नका.

प्रथमोपचार: (first aid)

उष्माघात हा अतिशय गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो, त्या कडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उष्माघात झालेल्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य उपचाराची गरज असते. वैद्यकीय उपचार मिळे पर्यन्त खालील प्रथमोपचार तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता.

  • उष्माघात झालेली व्यक्ति जर उन्हामध्ये असेल तर त्याला सुरवातीला थंड आणि हवेशीर ठिकाणी हलवा.
  • अंगावरील जास्तीचे कपडे काढा / घट्ट कपडे (tight clothes) सैल (loose) करा.
  • व्यक्तीला थंड करा: ओला कपडा अथवा स्पंज (the sponge) वापरुन त्या व्यक्तीच्या शरीराला थंड करा, किंवा स्प्रे ने अंगावर पाणी शिंपडा.
  • कपडा / पुठ्ठा यांचा वापर करून हवा घाला.
  • व्यक्ति जर शुद्धित असेल तर त्याला पाणी दया किंवा energy drink पिण्यासाठी दया.
  • तत्काळ वैद्यकीय मदत (Medical aid) मागवा, त्याला दवाखान्यात हलवा. उष्माघाता मुळे मेंदू, हृदय आणि इतर महत्वपूर्ण अवयवांना नुकसान होऊ शकते.

प्रथमोपचारा मुळे उष्माघाताची तीव्रता कमी होऊ शकते पण योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात लहान बाळा ची घ्या जास्त काळजी.

How to take care of baby (kids) in summer

लहान किंवा नवजात बाळाला त्याचा पहिला ऋतु (season) हा जड जातो अस म्हणतात म्हणजेच बाळाला त्या ऋतु मध्ये जास्त त्रास होतो. लहान मुलांची उन्हाळ्यात जास्त काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात लहान मुलांमध्ये रॅशेस (Rashes) म्हणजेच पुरळ उठण्याची समस्या होऊ होऊ शकते. त्यासोबतच त्वचेच्या संसर्गाचा धोका (Risk of skin infection) देखील असतो.

रॅशेस ची समस्या होऊ नये यासाठी बाळाला दररोज आंघोळ घाला. सोबतच बाळाचे दिवसातून दोन तीन वेळा आल्या कपड्याने अंग पुसवे. यामुळे बाळाचे शरीर थंड राहील आणि  रॅशेस ची समस्या जाणवणार नाही. बाळाचे हात नियमित पणे स्वच्छ करत राहावे, कारण बाळ आपले हात सतत तोंडात घालत राहते. हात स्वच्छ केल्याने संसर्ग (infection) होण्याचा धोका कमी होतो.

मुलांना सूती, सैल आणि कमी कपडे घालावेत. अंगाला चिटकतील किंवा घट्ट कपडे घालू नका.

घर बाहेर जाताना टोपीचा (Cap) वापर करा. टोपी मुळे ऊनहापासून संरक्षण होते आणि बाळाच्या कानात गरम हवा जात नाही.

उन्हाळ्यात लहान बाळांच्या खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. बाळ जर 6 महिन्यांपेक्षा लहान असेल तर पाणी देऊ नये पण दूध सतत देत राहावे. ज्यामुळे बाळाला योग्य प्रमाणत पाणी मिळत राहील.

मुलांची खोली हवेशीर असावी. दिवसभर बाहेरची गरम हवा खोलीत येणार नाही याची काळजी घ्यावी. पण सकाळी आणि संध्याकाळी   मोकळ्या हवेत बाळाला खेळू दया.  

हे वजनदार शब्द वापरा तुमच्या भाषणात, जे तुमचे भाषण करतील जबरदस्त.

उन्हाचा जास्त त्रास कोणाला होतो.

(Who suffers more from the heat?)

  • उन्हात कष्टाची कामे करणारे लोक
  • लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ति
  • स्थूल / जाड लोक (fat people)
  • पुरेशी झोप न झाल्यास
  • गर्भवती महिला (Pregnant women)
  • अनियंत्रित मधुमेह (uncontrolled diabetes)
  • ह्रदयरोग असणारे दारूचे व्यसन असणारे.

उन्हाळ्याची काळजी घ्या, स्वतःची आणि आपल्या प्रियजणांची.

Follow us on INSTAGRAM

Leave a Comment