What is Pitrupaksh? All information in Marathi

पितृपक्ष म्हणजे काय? काय असते श्राद्ध तिथी, पूजा विधी आणि महत्त्व

प्राचीन काळात आश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी नूतन वर्षारंभ होत असे. त्यामुळे चालू वर्षाच्या शेवचे पंधरा दिवस दिवंगत म्हणजेच हयात नसलेल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात. सतवाहण राजवटीत शालिवाहन शक सुरू झाले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होते. आणि हिंदू नववर्ष चैत्र पाडवा म्हणजे गुढी पाडव्याला सुरू केले जाते, मात्र महालय काळ बदलला गेला नाही, तो भाद्रपद महिन्याचा दूसरा आठवडचा राहीला. आणि ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे.

या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येते, आपला वंश वृक्ष समजतो. या निमित्त आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींची माहिती समजते, आठवणी जाग्या होतात, त्यांनी केलेल्या अभिमानास्पद कामांनी आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या कामातून प्रेरणा मिळते.

श्राद्ध पक्षाच्या वेळी आपले पूर्वज सूक्ष्म रूपात भूतलावर येतात आणि त्यांच्या नावाने केलेला प्रसाद स्वीकारतात असे मानले जाते. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते आणि घरात सुख शांती आनंद वावरतो. पितृ पक्ष हा भाद्रपद पौर्णिमेला सुरू होतो आणि भद्रापद महिन्याचा अमावास्ये पर्यन्त असतो.

पितृ पक्ष मराठी

पितृपक्षांमद्धे श्राद्ध विधी केल्याने पितृ दोषापासूण मुक्ती मिळते.  

वर्षातील पंधरा दिवसांच्या कालावधीत म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवस श्राद्ध विधी केले जातात. श्राद्ध पक्षाला पितृपक्ष किंवा महालय किंवा ग्रामीण भागात पितृवाडा देखील म्हणतात. श्राद्धाच्या वेळी कुटुंबातील देव देवता, पूर्वज आणि पितरा बद्दल आदर सन्मान व्यक्त केला जातो. असे मानले जाते की पितृ पक्षामद्धे आपले पूर्वज सूक्ष्म रूपात पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या नावाने केलेले मिष्टान्न ग्रहण करतात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते आणि घरात सुख शांती आनंद नांदतो. वर्षाच्या कोणत्याही पक्षात, ज्या तिथीला कुटुंबातील पूर्वजांचा मृत्यू झाला असेल, त्या तिथीला पितृपक्षात श्राद्ध करावे लागते.

या वर्षी 29 सप्टेंबर पासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. पितृ पक्ष 14 ऑक्टोबर पर्यन्त आहे.

पितृपक्षात पितरांच्या / पूर्वजांचे स्मरण कसे करावे.

पितृ पक्षात आपण आपल्या पूर्वजांना नियमित जल अर्पण केले पाहिजे. हे तर्पण दुपारी दक्षिण दिशेला मुख करून दिले जाते. काळे तीळ पाण्यात मिक्स करून ते जल भाताच्या पिंडीवर सोडले जाते. आपले पूर्वज ज्या दिवशी मृत्यू पावले त्या दिवशी अन्न आणि कपड्यांचे दान केले पाहिजे. ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांनी तर्पण करू नये. ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांनी दररोज सकाळी देव देवतांचे स्मरण करून सूर्याला जल अर्पण करावे. त्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्न धान्य दान केल्यास पुण्य फल प्राप्त होते. यानंतर पितृ पक्षाचे कार्य संपते.

भरणी श्राद्ध म्हणजे काय?

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर एक वर्षा नंतर भरणी श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे आहे. जे अविवाहित मरण पावतात त्यांचे भरणी श्राद्ध पंचमीला केले जाते. धार्मिक तीर्थ क्षेत्राला भेत न देता जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गया, पुष्कर आणि इतर ठिकाणी भरणी श्राद्ध करणे आवश्यक आहे. या वर्षी भरणी श्राद्ध 2 ऑक्टोबर या दिवशी आहे (संध्याकाळी 6:24 पर्यन्त).

नवमी श्राद्ध

पितृ पक्षातील या श्रद्धाला मातृश्राद्ध असे देखील म्हटले जाते. या तिथीला आईचा सन्मान करण्यासाठी श्राद्ध केले जाते. या दिवशी ज्या स्त्रिया सौभाग्यवती असताना मृत पावल्या त्यांचे या दिवशी श्राद्ध केले जाते. या वर्षी ही तिथी 7 ऑक्टोबर रोजी आहे.

सर्व पितृ अमावस्या

ज्यांच्या मृत्यूची निश्चित तारीख माहिती नाही त्यांच्यासाठी हे श्राद्ध घातले जाते. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही तर तुम्ही या दिवशी श्रद्धह करू शकता. या वर्षी 14 ऑक्टोबर ला ही तिथी आहे.  

पितृ पक्षात हे उपाय करा ज्यामुळे तुम्हाला होईल फायदा.

पितृ पक्षात तुमच्या घरात किंवा दरात कोणताही पशू पक्षी याला तर त्याला खायला द्यावे. दरात आलेल्या कोणाचाही अपमान करू नये. असे मानले जाते की आपले पूर्वज त्या रूपांमध्ये आपल्याला भेटायला येत असतात. पितृपक्षात ब्रम्हणणा अन्न दान केले तर ते फलदायी ठरते.

या पंधरा दिवसांच्या कालावधीत गाईला चारा खाऊ घालवा, दररोज जेवन बनवताना गाईसाठी पहिली चपाती / पोळी करावी, असे केल्याने देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पितृ पक्षात गाईला गवत चारा खाऊ घालण्याने पितरांचा आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबावर राहतो.

पितृ पक्षामद्धे आपल्या पूर्वजांच्या नावाने दररोज सकाळ संध्याकाळ दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावावा, यामागचे कारण म्हणजे असा समाज आहे की पितृ पक्षामध्ये पूर्वज हे दक्षिण दिशेकडून भुतालावर येतात.

पितृपक्षात दररोज सकाळी घराची साफ सफाई केल्या नंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, व नकारात्मक ऊर्जा आणि दोषापासून मुक्ती प्राप्त होते आणि पितृदोष मुक्ती मिळते. पितृ पक्षात दररोज अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे.

पितृ पक्षात हे करायचे टाळा.

श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसांमध्ये केस व नखे कापू नयेत. ब्रम्हचाऱ्याचे पालन करावे. श्राद्ध विधी हा दिवसा करावा, सूर्यास्ता नंतर श्राद्ध करणे हे अशुभ मानले जाते.

या दिवसांमध्ये काकडी, हरभरे, मसूर, दुधी, काळमिठ, मुळा, सातू, साग, जिरेमोहरी खाऊ नयेत. पशू पक्षी प्राणी यांना त्रास देऊ नका.

 या काळात मांसाहार करू नये, मद्यपान टाळावे.

झाड कापू नयेत.

या दरम्यान नवीन वस्त्र परिधान करू नये. नवीन वस्तूंची खरेदी करू नये.

या काळात स्वयंपाक घरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत. स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. पितृ पक्षात स्वयंपाक घरात बेसिन मध्ये उष्टी भांडी ठेवणे अशुभ समले जाते. रात्री उष्टी भांडी ठेवल्या मुले लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृ दोष देखील होतो. म्हणून या काळात घरात उष्टी भांडी ठेऊ नका.

या काळात विवाहम मुंडन, उपनयन संस्कार करू नयेत.

(लिहलेली माहिती वेगवेगळे सोर्स वाचून लिहण्यात आलेली आहेम याच्या सत्य असत्याबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. अंधश्रद्धेला दुजोरा देत नाहीत.)

श्रद्धा अंधश्रद्धा हे विषय आपण बाजूला ठेवून पितृ पक्षाकडे बघितले तर, पूर्वजांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतलेले असतात, आपल्या भविष्यासाठी कष्ट केलेले असते. त्यांची आठवण राहवी, त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत सदैव राहवे म्हणून आपण पितृ पक्ष करावा.

खरे म्हणजे, जर आपले पूर्वज या काळात भुतालावर येत असतील आणि आपल्या कामाचे अवलोकन करत असतील तर त्यांचे आशीर्वाद आपल्या कामाला लाभले पाहिजेत. वर्षातून एक दिवस पितरांसाठी द्यावा.

आपले अस्तित्व ज्यांच्या मुले निर्माण झाले त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले पाहिजेत असा सकारात्मक विचार जोपासयला हवा.

Human Diet information

FacebookPage

Leave a Comment