Human diet and its importance

मानवी आहार आणि त्याचे महत्त्व

आहार म्हणजे अन्न. अन्न हा असा पदार्थ आहे जो सजीवांना त्यांचा वाढीसाठी, विकासासाठी आणि सर्वांगीण पोषणासाठी आवश्यक ऊर्जा, पौष्टिक घटक देत असतो. अन्न हे सामान्यतः वनस्पति किंवा प्राण्यांपासून प्राप्त केले जाते.

आपल्या शरीराची कार्यक्षमता, निरोगीपना अबाधित ठेवण्यासाठी मानवी शरीराला योग्य आहाराची गरज असते. स्निग्ध पदार्थ (Fats), कऱ्बोदके (Carbohydrates), प्रथिने (Proteins), क्षार (Minerals), जीवनसत्वे (Vitamins), पाणी या सर्व घटकांचा समावेश हा संतुलित आहारात होत असतो.

मानवी आहारातील अन्न पदार्थ ज्या प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यक असतात त्या नुसार त्याचे दोन गटात पडतात.

Macronutrients: (स्थूल पोषक तत्त्वे)
स्थूल पोषक तत्त्वे हे आपल्या शरीरसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात.याच्या मध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ(Fats) यांचा समावेश होतो.

Micronutrients: (सूक्ष्म पोषक तत्त्वे)
ही पोषक तत्त्वे आपल्या शरीराला अल्प म्हणजे कमी प्रमाणात आवश्यक असतात. जसे की वेगवेगळी जीवनसत्त्वे, क्षार असे घटक.

अन्न पदार्थांचे त्याच्या स्त्रोतावरून, रचनेवरून, कार्य आणि पोषक मूल्यांकना वरून आपण वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करू शकतो.

सामान्य वर्गीकरण

1. प्राणीज : (Animal Derived)

जे अन्न पदार्थ हे प्राण्यांपासून मिळवले जातात त्यांना प्राणीज या गटात समाविष्ट केले जाते.
उदा: अंडी, मांस, दूध व दुग्धजन्य पदार्थ इत्यादी

2. वनस्पतीजन्य पदार्थ:

जे अन्न पदार्थ हे वनस्पति पासून मिळवले जातात किंवा तयार केले जातात त्यांनी वनस्पतिजन्य अन्न पदार्थ म्हटले जाते.
उदा: धान्य, फळे, भाज्या इत्यादी.

रासायनिक रचनेवरून अन्न पदार्थांचे पुढील गटात वर्गीकरण केले जाते.

 1. प्रथिने
 2. मेद पदार्थ
 3. कर्बोदके
 4. जीवनसत्त्वे

अन्न पदार्थांच्या कार्यावरून देखील त्यांचे पुढील वर्गीकरण आपण करू शकतो.

 1. ऊर्जा म्हणजेच शरीराला आवश्यक शक्ति देणारे अन्न घटक
 2. शारीरिक वाढीसाठी आवश्यक अन्न घटक
 3. संरक्षण

पोषणतत्त्व मूल्यावरुन खालील प्रकार पडतात.

 1. एकदल धान्य
 2. द्विदल धान्य
 3. हिरव्या भाज्या
 4. फळे
 5. तेल / मेद पदार्थ
 6. साखर / गूळ
 7. मसाले
 8. तेलबीया
 9. इतर

प्रथिने (Proteins)

प्रथिने हे मोठे, जटिल रेणु (Complex molecules) आहेत जे संजीवांच्या पेशी (Cells), उती (Tissues) आणि अवयवांची (organs) रचना (Structure), कार्य (function) आणि नियमन (Regulation) यामध्ये आवश्यक भूमिका निभावत असतात.

 मानवी शरीराला जे अत्यावश्यक 3 स्थूल पोषक तत्त्वे आवश्यक असतात त्यातील प्रथिने हे एक आहेत. प्रथिने हे लहान लहान अमिनो आम्लच्या यूनिट पासून बनलेली असतात हे यूनिट एक विशिष्ट क्रमाने एकमेकांशी जोडलेले असतात.

मानवी शरीराला एकूण 20 अमिनो आम्लाची गरज असते त्यापैकी नऊ अमिनो आम्ले आपल्या शरीरा मध्ये तयार होत नाहीत, ती बाहेरच्या आहारातून आपल्याला घ्यावी लागतात.

 1. हिस्टिडाइन(Histidine): यापासून हिस्टॅमिन तयार होते.
 2. आयसोल्युसीन (Isoleucine): हे हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत करते, हे एक लाल रक्त पेशींमध्ये ऑक्सीजन चे वहण करणारे रंगद्रव्य आहे. यामुळे रक्तातील साखर देखील नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
 3. ल्युसीन (Leucine): हे आम्ल स्नायूना मजबूत बनवते.
 4. लायसीन (Lysine):  लायसीन मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे कारण प्रथिने संश्लेषण, एंजाइम उत्पादन आणि कॅल्शियम शोषण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बाजवतो.
 5. मिथीओनिन (Methionine): मेथिओनाइन मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे कारण ते प्रथिने संश्लेषणातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि शरीरातील इतर महत्त्वपूर्ण रेणूंसाठी अग्रदूत म्हणून काम करते.
 6. फेनिललानिन (Phenylalanine): फेनिलॅलानिन मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे कारण ते महत्त्वपूर्ण न्यूरोट्रांसमीटरच्या संश्लेषणासाठी एक अग्रदूत आहे आणि प्रथिने संश्लेषणात भूमिका बजावते.
 7. थ्रोनिन (Threonine): मानवी आरोग्यासाठी थ्रोनिन आवश्यक आहे कारण ते प्रथिने संश्लेषणास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ति कायम राखते आणि योग्य शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेले विविध रेणू तयार करण्यास मदत करते.
 8. Tryptophan (ट्रिप्टोफॅन): ट्रिप्टोफॅन मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे कारण ते सेरोटोनिन आणि मेलाटोनिन, मूड आणि झोपेचे नियमन करणारे न्यूरोट्रांसमीटर आणि प्रथिने संश्लेषणामध्ये देखील सामील आहे.
 9. व्हॅलिन (Valine): मानवी आरोग्यासाठी व्हॅलिन आवश्यक आहे कारण ते एक अत्यावश्यक अमीनो आम्ल आहे जे स्नायूंच्या वाढीस आणि दुरुस्तीस मदत करते, ऊर्जा पातळी नियंत्रित करते आणि शरीरात योग्य नायट्रोजन संतुलन राखण्यास मदत करते.

प्रथिने मानवांसाठी अत्यावश्यक आहेत कारण ते ऊती आणि एन्झाईमसाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करतात, पचन, रोगप्रतिकारक प्रतिक्रिया आणि सेल सिग्नलिंग यासारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रियांचे नियमन करतात.
प्रथिने आपल्या शरीराला पुढील खाद्य पदार्थतून मिळतात.
दूध, मांस, मासेम अंडी या प्राणिज पदारथामद्धे. तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन या वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये, ज्वारी, बाजारी, गहू, नाचणी या धान्यामध्ये तसेच शेंगदाणे, बदाम, तीळ, करडई यासारख्या टेलबियांत प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात.

कर्बोदके

आपण जे काही काम करतो ते करण्यासाठी आपल्याला एक ऊर्जा लागते, ही ऊर्जा म्हणजे एक उष्मांक म्हणजेच एक कॅलरी होय. आहारामध्ये किलो कॅलरी हे मापक वापरले जाते.
शरीराला लागणारी ऊर्जा ही अन्न पदार्थतून मिळत असते.
कार्बोहायड्रेट्स हा वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांसह सजीवांमध्ये आढळणाऱ्या जैव अणूंचा एक प्रमुख वर्ग आहे. ते ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत म्हणून काम करतात आणि विविध सेल्युलर कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रासायनिकदृष्ट्या, कार्बोहायड्रेट्स कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंनी बनलेले असतात.

(CH2O)n हे कर्बोदकाचे रासायनिक सूत्र आहे.

कर्बोदकांना तीन मुख्य गटांमध्ये वर्गीकृत केले जाते:

मोनोसाकराइड्स (Monosaccharides)

ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलेक्टोज हे मोनोसाकराइडस चे प्रकार आहेत. ग्लुकोज हे मुख्यतः ऊर्जा निर्माण करण्यासाठी गरजेचे असते.

डायसॅकराइड्स (Disaccharides):
डायसॅकराइड्स हे दोन मोनोसाकराइड्स चे मिळून तयार होत असते.

खालील काही डायसाकराइड्स चे उदाहरणे आहेत.
Sucrose (Glucose + Fructose),
Lactose (Glucose + Galactose),
Maltose (Glucose + Glucose).

Polysaccharides (पॉलिसेकेराइड्स):
दोनपेक्षा अधिक मोनोसाकराइड्स च्या chain चे मिळून पॉलिसेकेराइड्स बनते. हे ऊर्जा साठवून ठेवण्याचे कार्य करतात.

स्टार्च, ग्लायकोजेन, सेल्युलोज (cellulose) हे काही उदाहरणे आहेत.

कार्बोहायड्रेट्सचे महत्त्व:

उर्जा स्त्रोत: कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरासाठी उर्जेचा प्राथमिक (मुख्य) स्त्रोत आहेत.

मेंदूचे कार्य: मेंदू ऊर्जा स्त्रोत म्हणून ग्लुकोजवर खूप अवलंबून असतो. मेंदू शरीराला लागणाऱ्या जवळपास 20% उर्जेचा वापर करत असतो. ग्लुकोज जे विचार करणे, आकलन करणे, लक्षात ठेवणे, निर्याण क्षमता यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते.

हटके मराठी वाक्प्रचार

जीवनसत्त्वे

जीवनसत्त्वे ही अत्यावश्यक सेंद्रिय संयुगे आहेत जी मानवी शरीराला विविध शारीरिक कार्यांना मदत देण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी थोड्या प्रमाणात आवश्यक असतात. ऊर्जा पुरवणाऱ्या मॅक्रोन्युट्रिएंट्स (जसे की कर्बोदके, प्रथिने आणि Fats) सारखे जीवनसत्त्वे थेट ऊर्जा प्रदान करत नाहीत. परंतु अनेक जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये कोएन्झाइम्स (coenzymes,), उत्प्रेरक (catalysts) आणि नियामक (regulators) म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

जीवनसत्त्वे त्यांच्या विद्राव्यतेच्या आधारावर दोन मुख्य गटांमध्ये विभागली जातात.

पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे: (Water-Soluble Vitamins)

हे जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात आणि शरीरात जास्त प्रमाणात साठवले जात नाहीत. म्हणून ते आहाराद्वारे नियमितपणे सेवन करणे आवश्यक आहे.

खालील जीवनसत्त्वे हे गटात मोडतात.
Vitamin C, Vitamin B-Complex (B1, B2, B3, B6, B7 (biotin), B9 (फोलेट), B12).

चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वे (Fat-Soluble Vitamins):

हे जीवनसत्त्वे चरबीमध्ये विरघळणारे असतात आणि शरीरातील फॅटी टिश्यूमध्ये साठवले जातात.
यामध्ये अ-जीवनसत्त्व, ड- जीवनसत्त्व, इ- जीवनसत्त्व, क- जीवनसत्त्व. ही जीवनसत्त्वे चरबीमध्ये साठवली जातात. ही जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे कालांतराने विषामध्ये रूपांतर होत असते. त्यामुळे या जीवनसत्वांचे योग्य संतुलन राखणे आवश्यक असते.

जीवनसत्त्व ‘अ’:

डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हे जीवनसत्त्व महत्वाचे आहे. याच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणाचा आजार होतो. गाजर, रताळे, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक यामध्ये अ-जीवनसत्त्व आढळते.

जीवनसत्त्व ‘ब’:

‘ब’ जीवनसत्त्वे ही शरीरातील विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ते चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहेत. ब जीवनसत्त्वे का महत्त्वाची आहेत याची काही कारणे येथे आपण पाहुयात:

ब जीवनसत्त्व हे अन्नाचे रूपांतर उर्जेत करण्यात महत्वाचे असते.
पेशींची (Cells) वाढ आणि विभाजन करण्यामध्ये ब जीवनसत्वाचा उपयोग होत असतो.
लाल रक्त पेशी निर्मितीसाठी Vitamin-B गरजेचे आहे.
मज्जासंस्थेचे आरोग्य, त्वचा व केसांचे आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ति चांगली ठेवण्यात देखील ब जीवनसत्त्व महत्वपूर्ण आहे.
ब जीवनसत्त्वच्या कमतरतेने बेरीबेरी हा आजार होऊ शकतो हे आपण शाळेपासून एकत आलो आहोत.
तोंडात फोड येणे म्हणजे तोंड येणे, रक्त फिकट होणे, ओठ, कान, नाक यावर चिरा पडणे, पाय दुखणे किंवा पायाची आग होणे ही सर्व बेरीबेरी ची लक्षणे असू शकतात.

हिरव्या पालेभाज्या हा या जीवनसत्वाचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे, म्हणून आपण रोजच्या जेवणामद्धे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की असाल पाहिजे.

जीवनसत्त्व ‘क’:
Vitamin c ला ascorbic acid देखील म्हटले जाते. शरीरातील विविध शारीरिक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले हे जीवनसत्व आहे.
जीवनसत्त्व ‘क’ हे पेशींचा रक्षणकर्ता आहे. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकार शक्ति अबाधित ठेवण्यासाठी देखील मदत करते. पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन आणि कार्य यामध्ये क जीवनसत्त्व महत्वाची भूमिका बजावत असते. या पांढऱ्या रक्तपेशी आजरांच्या संक्रमणा पासून आपले रक्षण करत असतात.

त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी, जखम लवकर भरून येण्यासाठी आणि संयोजि उतीनचे आरोग्य राखण्यासाठी उपयोगी आहे.
आंबट फळ्यांमध्ये क-जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते.

जीवनसत्त्व ‘ड’:
जीवनसत्त्व ‘ड’ शरीरातील विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
त्याच्या प्राथमिक कार्यांपैकी एक म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषणाचे नियमन करणे, जे निरोगी हाडे आणि दातांचे अयोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे.

स्त्रोत: ‘ड’ जीवनसत्त्व हे कोवळ्या सूर्यप्रकाशातून, आहारातून किंवा supplements मधून आपण मिळवू शकतो.
जीवनसत्त्व ‘ड’ च्या कमतरतेमुळे मूडदूस होतो.

तुम्ही व्यावसायिक / उद्योजक आहात तर हे वाचाचं.
क्लिक करा

फेसबूक पेज


1 thought on “Human diet and its importance”

Leave a Comment