‘Effective use of FOMO’ in Marathi for Business Growth!

फोमो (FOMO) हा शब्द तुम्ही कधी ना कधी एकला असेलच. या शब्दाने सध्याचा पिढीच्या आयुष्याला घेरले आहे. हा शब्द बऱ्याच अर्थाने आपण नकारात्मक (Negative) पद्धतीने एकला असेल. पण याच फोमो (FOMO) चा वापर तुम्ही तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी (Business Growth) करू शकता. लोकांनी याच गोष्टीचा वापर करून करोडो कमावले, तुम्ही कामवू शकता. कस ते जाणून घ्यायचे आहे तर हा ब्लॉग नक्की वाचा.

FoMO म्हणजेच Fear of Missing Out (FoMO) याचाच मराठीत अर्थ होतो हरवण्याची भीती किंवा संधी हातातून निसटण्याची भिती. 2004 मध्ये सोशल नेटवर्किंग साइट्सवर (Social Networking Sites) पाहिल्या गेलेल्या काही घटनांचे वर्णन करण्यासाठी हा एक अद्वितीय शब्द (Unique word) निर्माण झाला.
व्यवसाय आणि संवाद कौशल्य

व्यवसाय आणि संवाद कौशल्य

FOMO मध्ये दोन प्रक्रियांचा समावेश आहे; पहिले काही तरी हरवण्याची भिती निर्माण होणे (Fear of losing something) आणि त्यामुळे आपले काहीतरी खूप मोठे नुकसान होईल ही भावना निर्माण होणे. यामुळे त्या व्यक्तीची मनात अस्वस्थतेच्या भावना निर्माण होते, त्यांना वाटायला लागते के इतरांना ज्या गोष्टीतून आनंद मिळत आहे त्यात आपण नाहीत.

हा शब्द अनेकदा सामाजिक कार्यक्रम (Social Events), Activities किंवा ट्रेंडच्या (Trend) संदर्भात वापरला जातो, विशेषत: सोशल मीडियाच्या युगात, जिथे लोक त्यांच्या जीवनातील हायलाइट शेअर करतात.

आजच्या एकमेकांशी जोडलेल्या इंटरनेट च्या जगात ही एक सामान्य घटना आहे, जिथे लोक सहसा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे इतरांच्या जीवनाचे curated glimpse (निवडक क्षणचित्र) पाहतात, ज्यामुळे संभाव्यतः रोमांचक किंवा महत्त्वाचे अनुभव गमावल्याची भावना निर्माण होते.

Keywords: Fear of missing out, Mental health, Physical well-being, Academic performance, Fear of missing out-reduction, Problematic social media

फोमो ला बऱ्याच अर्थाने नकारार्थी पद्धतीने बघितले जाते. आजच्या इंटरनेट आणि social media च्या युगामध्ये फोमो ने तरुण पिढीला घेरले आहे. एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आहे. स्वतःला इतरणपेक्षा पुढे आणि वेगळे दाखवण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील आता तरुण पिढी समाज माध्यमांवर अतिशय सक्रिय आहे. 

याच फोमो चा वापर तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगामद्धे करून तुमचा व्यवसाय उद्योग वाढवू शकता. तुमचा सेल्स वाढवू शकता. फोमो चा वापर व्यवसायात कसा करायचा ते आपण सविस्तर पाहुयात.

Keywords: How to increase Sels. ग्राहक कसे वाढवावे.

“FOMO,” किंवा मिसिंग आउटची (Missing Out) भीती, ही एक मनोवैज्ञानिक भावना (psychological feeling) आहे, ज्याचा विक्रीमध्ये खरेदीची संधी निघून जाण्याची भावना निर्माण करण्यासाठी किंवा ग्राहकांच्या कृतीला चालना देण्यासाठी प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो. तुमच्या उत्पादनांच्या विक्रीमध्ये FOMO वापरण्यासाठी येथे काही महत्वाच्या टिप्स (Important Tips) आहेत:

Limited-Time Offers: (मर्यादित कालावधीसाठी ऑफर)
ठराविक कालावधीसाठी promotions (जाहिरात) आणि सेल (Sell) जाहीर करा. ही ऑफर मर्यादित कालावधी साठीच आहे हे जाहिरात (Advertising) करताना हायलाइट (Highlight) करा. जर ही वेळ निघून गेली तर तुम्ही या ऑफर चा फायदा घेऊ शकणार नाहीत, त्यामुळे तुम्ही त्वरित खरेदी करा, यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करा. ही संधी गेली तर पुढील ऑफर येण्यासाठी त्यांना खूप काळ थांबावे लागेल हे पटवून दया.
उदा: जर तुम्ही शूज (Shoes) विकत आहात तर तुम्ही सेल लावू शकता की या आठवड्यासाठी सरसकट 20% सूट.

keywords: Marketing tips in Marathi. मार्केटिंग कशी करावी.

Limited Quantity: (मर्यादित संख्या / साठा)
मर्यादित स्टॉक किंवा उपलब्धतेवर जोर द्या. जेव्हा तुम्ही असा विश्वास पटवून देता की हे प्रॉडक्ट हे मर्यादित संख्येत उपलब्ध आहे, किंवा साठा संपत आला आहे. जेव्हा ही गोष्ट तुम्ही ग्राहकाच्या लक्षात आणून देता तेव्हा तो लवकर खरेदी करण्याची शक्यता असते.
उदा: जर तुम्ही ऑनलाइन एखादे प्रशिक्षण घेत असाल तर तुम्ही म्हणू शकता की फक्त 20 जागा (Only Last 20 Spots Available) उपलब्ध.

Exclusive Deals for Early Buyers: (सुरुवातीच्या खरेदीदारांसाठी विशेष सवलत)
लवकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विशेष सवलत किंवा बोनस ऑफर करा. यामुळे त्यांना विशेष वाटते आणि ऑफर संपण्यापूर्वी त्यांना खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते.
उदा: जर तुम्ही सोन्याचे नवीन दुकान सुरू करत आहात तर तुम्ही ऑफर देऊ शकता की पहिल्या 100 ग्राहकांसाठी घडणावलीवर 50% सूट (50% Off on Making Charges).

Real-Time Updates:
Real-Time Update म्हणजे तुमच्या सेवे बद्दल किंवा प्रॉडक्ट बद्दल वेळोवेळी ग्राहकांना अद्ययावत म्हणजे update करणे. त्यातून त्यांना तुमच्या प्रॉडक्ट ची लोकप्रियता (Popularity) आणि तुम्ही आता पर्यन्त विकलेली यूनिट कळू दया. इतरांना सक्रियपणे खरेदी करताना पाहून FOMO ट्रिगर होऊ शकते.

Customer Testimonials and Reviews:
ग्राहकांच्या Testimonials म्हणजेच अभिप्रायला सध्या अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातुन इतराना हे लक्षात येते की तुमची सेवा (Service) किती दर्जेदार (Quality Oriented) आहे. जेव्हा तुमचे संभाव्य ग्राहक (Potential Customer) इतरांना तुमचे उत्पादन (Product) घेताना आणि त्याचा आनंद घेताना बघतात तेव्हा त्यांना तो आनंद गामावण्याची भिती वाटते आणि ते आपोआप तुमच्या कडे आकर्षित (Attract) होतात.
उदा: जर तुमचे एखादे हॉटेल / रेस्टॉरंट आहे तर तुम्ही तुमचे Instagram / फेसबुक (Or Other Social Networking Sites) वर तुमच्या ग्राहकांच्या तुमच्या कडे मिळणाऱ्या खाद्य पदार्थ विषयीच्या सकारात्मक प्रतिक्रिया दाखवू शकता.

Keyword: What is FoMO? फोमो म्हणजे काय?

Social Proof: (समाज मध्यमांवरील पुरावे.)
तुमच्या सोशल मीडिया वरील खात्यांवर (Social Media Accounts) फॉलोअर्स, लाईक्स, शेअर्स यांना अधोरेखित करा. त्यामुळे लोकांना समजेल की तुमचे प्रॉडक्ट लोकप्रिय (Popular) आहे आणि त्यामुळे FOMO Trigger होईल.

तुमचा सेल्स वाढवण्यासाठी फोमो हा एक अतिशय उत्तम मार्ग आहे. लक्षात ठेवा एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे की नाही या पेक्षा ती माझ्याकडे नाही आणि त्यामुळे माझे खूप नुकसान होत आहे किंवा त्यामुळे मी इतरांपेक्षा कमी आहे. ही भावना निर्माण होणे आणि त्याचा योग्य पद्धतीने आपल्या व्यवसायात उपयोग करून घेणे यालाच योग्य मार्केटिंग म्हणतात.
इथे तुम्ही कोणालाही फसवत नाहीत किंवा कोणाचा गैर फायदा देखील घेत नाहीत तुम्ही फक्त त्यांच्या भावनांचा तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने योग्य वापर करून घेत आहात.

कुठलेही मार्केटिंग किंवा सेल्स करत असताना आपल्याला ग्राहकांच्या भावना जर योग्य पद्धतीने हाताळता आल्या तर नक्कीच तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करू शकतात.

आपण खालील उदहरणातून पाहुयात की फोमो चा वापर आपण कसा करू शकतो ते.

उदा: समाज तुमचे कोचिंग क्लासेस आहेत. तुम्ही नवीन बॅच सुरू करत आहात तर त्याचा WhatsApp मार्केटिंग मेसेज कसा असेल ते पाहूया.

Hey Hi,
   तुमच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती विषयी चिंतित आहात? धावपळीच्या जगात मुलांकडे योग्य लक्ष देऊन अभ्यास करून घेता येत नाहीये?

चिंता सोडा, आम्ही आहोत ना तुमच्या पाल्याची अभ्यासात मदत करण्यासाठी.

Limited Seats: Only 25 spots available!
(मर्यादित जागा उपलब्ध असे अधोरेखित करा.)

🎉 Success Stories: Hear from those who’ve transformed their careers!
(माजी विद्यार्थ्यांच्या काही यशोगाथा Youtube / Google Drive / Other Cloud Storage वर upload करून त्याची लिंक मेसेज मध्ये दया.)

💸 Early Bird Offer: First 10 enrolments get an exclusive discount!
(पहिल्या 10 जागांसाठी विशेष ऑफर जाहीर करा.)
अधिक माहितीसाठी संपर्क करा अथवा भेट दया यांच्या क्लासेस ला आणि सज्ज व्हा तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी.
खूप उशीर होण्यापूर्वी आता कृती करा! तुमचा यशाचा प्रवास इथून सुरू होतो.
Thank You!
[Your Classes name]
[website]

तुम्हाला आमचा लेख आवडला असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्र परिवारात शेअर करा.
फोमो म्हणजे काय? What is FOMO?

follow us on Instagram

Leave a Comment