How important is public speaking for entrepreneurs?

उद्योजकांसाठी सार्वजनिक बोलणे किती महत्त्वाचे आहे?

आज आपण पाहणार आहोत की संभाषण कौशल्य हे उद्योजकांसाठी किती महत्त्वाचे आहे.

एखादा व्यवसाय उद्योग उभा करणे असो की मग साधे दुकान टाकणे असो, सर्वात महत्त्वाचे भांडवल असते तुमचे Communication skill  म्हणजेच तुमचे वाकचातुर्य.
वाकचातुर्य म्हणजे कोणाला गोड गोड बोलून गंडा घालणे अजिबातच नव्हे. Business करत असताना तुमचे communication skill नेमके कसे हवे हे आपण पाहणार आहोत.

तुम्ही तुमच्या Business साठी investor शोधत असाल किंवा तुमचे Product तुमच्या client / customer ला present करत असाल किंवा मग तुमच्या व्यवसायाचे presentation एखाद्या event मध्ये देत असाल, प्रत्येक ठिकाणी लागते ते effective communication म्हणजेच उत्तम संवाद कौशल्य.

पाहूया काही टिप्स विशेषत: ज्या तयार केल्या आहेत उद्योजकांसाठी.

 1. Know Your Audience: तुमचा ग्राहक ओळखा.
  म्हणजेच प्रत्येक ग्राहकाला सारखेच dialog मारू नका, प्रत्येक व्यक्ति हा वेगळा असतो. त्या व्यक्तीला समजून घ्या, त्याची पार्श्वभूमी समजून घ्या मग त्या हिशोबणे तुमचे dialog बनवा, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि sell लवकर होईल.
  खालील गोष्टींची तपसणी करा.
  A. गरज काय आहे?
  B. Interest काशामद्धे आहे?
  C. अपेक्षा काय आहेत.
  इतक्या गोष्टी जर तुम्ही माहिती करून घेतल्या आणि त्यानुसार तुमचे बोलने ठेवले तरी ग्राहक आपलाच आहे.
 2. बोलण्याचे उद्दिष्ट स्पष्ट ठेवा:
  बोलताना मोजक बोला, मुद्याच बोला. ग्राहकाला गोल गोल फिरवून बोललेले लगेच समजते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पेक्षा आपला customer आजकाल smart झाला आहे. तुमच्या बोलण्याचे उदिष्ट समोरील व्यक्तीला स्पष्ट झाले की मग जास्त काही बोलण्याची गरज लागत नाही.
 3. आकर्षक कथा तयार करा:
  तुमच्या customer ला 100% खात्री देण्यासाठी तुमच्या success story तयार करा. त्या गोष्टीच्या स्वरूपात तयार करा, तुमच्या business चा प्रवास सांगा. या गोष्टींमध्ये reality दाखवा, जास्त भंपकपणा नको. लोक गोष्टींना connect होत असतात, तुमचे बोलणे लक्षात राहते.  
 4. Active Listening:
  संभाषण कौशल्य ही two-way process आहे. तुमची एकण्याची क्षमता चांगली असली पाहिजे. समोरील व्यक्तीला नीट ऐका, समजून घ्या, प्रश्न विचारा. त्यामुळे तुम्हाला बोलायला आयते (readymade) मुद्दे मिळतात.
 5. Use Visual Aids:
  Visuals मुळे तुमच्या बोलण्याला clarity मिळते, समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी दृढ होतो. Charts, graphs, images चा वापर करा. Visual Aids मुळे अवघड गोष्टी पण सोप्या पद्धतीने सांगता येतात.
 6. Be Authentic and Transparent:
  (प्रामाणिक आणि पारदर्शकपणा ठेवा.)
  Authenticity builds trust म्हणजेच प्रामाणिकणा विश्वास निर्माण करतो. बोलन्यामद्धे खरेपणा आणि पारदर्शकता कायम ठेवा, फक्त customer सोबतच नाही तर आपल्या employees सोबत, investors सोबत, partner सोबत देखील खरेपणा आणि पारदर्शकता कायम ठेवा. लोक प्रमाणिकपणाचे आणि मोकळेपणाचे कौतुकच करतात.
 7. Practice Empathy:
  ही term समजायला थोडी अवघड आहे पण एकदा का समजली की ज्या गोष्टी आपल्या दृष्टीने कठीण वाटत होत्या त्या अगदी सोप्या होतील. Empathy म्हणजेच सहानभूती.
   Put yourself in the shoes of your customer, म्हणजे तुमचा ग्राहक जसा विचार करू शकतो तसा विचार करा, त्यांच्या मनामध्ये काय काय प्रश्न येऊ शकतात, काय शंका येऊ शकतात हे समजून घ्या, त्यावर उत्तरे तयार करा, म्हणजे पुढील वेळी जर असा एखादा प्रश्न आला तर तुम्ही सफाईदारपणे उत्तर देऊ शकाल.
 8. Use Non-Verbal Communication:
  तुम्ही न बोलत तुमची body खूप काही बोलत असते आणि त्यालाच Non-Verbal Communication अस म्हणतात. तुमच्या Body Language वर, चेहऱ्यावरील हावभावावर लक्ष ठेवा. Eye – contact ठेवा, सकारात्मक posture ठेवा. हातवाऱ्यांचा योग्य उपयोग करा.
 9. Be Confident:
  आपल्या स्वभावात, आपल्या वागण्यात confidence दिसला पाहिजे. मुळमुळीत लोकांसोबत काम करायला सहसा कोणाला आवडत नाही. तुमच्या वागण्या बोलण्यात जर confidence दिसला तर लोकांवर आपोआप तुमचा प्रभाव दिसायला लागतो.
 10. Seek Feedback:
  आपल्या जवळच्या लोकांकडून, आपल्या employees कडून अभिप्राय घेत रहा. त्यातून जे minus point येत असतील त्यावर काम करा. Feedback तुम्हाला upgrade होण्यासाठी मदत करत असतात.

लक्षात ठेवा, effective communication हा एक प्रवास आहे, या प्रवासात सराव करत राहणे आवश्यक आहे. उत्तम संभाषण कौशल्यामुळे तुम्ही उत्तम पद्धतीने express होऊ शकता, नातेसंबंध दृढ होतात, लोक तुमच्याकडून inspire होत असतात.

संभाषण कौशल्यासोबतच खालील गोष्टी पण करत लक्षात ठेवा, नक्कीच व्यवसायमद्धे मदत होईल.

यश (Success) हे अंतिम नसते, अपयश हे प्राणघातक नसते, पुढे चालत राहण्याचे धैर्य  ठेवा. यश नावाचा कोणताही थांबा नाही.

अकड्यांवर लक्ष ठेवा. Profit, Margin आणि cash flow हेच यशाचे गमक आहे.

येथे एक उदाहरण पाहू.

शिरीष नावाचा एक व्यक्ति आहे त्याने दहा लाख गुंतवूनक करून एक व्यवसाय उभा केला. त्या व्यवसायातून त्याच्या हातात एक लाख येतात, पण शिरीष त्याचे कुठलेही विभाजन करत नाही. घरखर्च, मंजुरांचा पगार, व्यवस्थापन खर्च याचे कोणतेही गणित नाही. आणि त्यामुळे शिरीष ला वाटत आहे की तो खूप काही कमावत आहे. पण हेच त्याने जर सर्व हिशोब ठेवले, तर त्याच्या लक्षात येईल की actually त्याच्या हातात खर्च करून किती पैसा शिल्लक राहत आहे ते.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा हिशोब नीट ठेवा.

Customer satisfaction: ग्राहकांचे समाधान हे तुमच्या व्यवसायाच्या गाडीचे इंधन आहे. रोज रोज नवीन customer शोधण्यापेक्षा जुन्या customer ला आपले प्रॉडक्ट परत परत विकणे आणि त्यांच्या कडून reference ने आणखी customer मिळवणे हे खरे कौशल्य आहे.

Embrace change: बदल स्वीकारा, काही ठराविक कालवाढीने बदल करणे गरजेचे असते, अपरिहार्य असते. थांबला तो संपला म्हणतात. काळानुसार आपल्या व्यासायत हवे ते बदल करत रहा, काळसोबत चला.

Invest in your team: मी अशी बरीच मंडळी बघितली आहेत की जे फक्त कमी पैसा लागावा म्हणून पात्रता नसलेल्या व्यक्तीला पण कामावर ठेवतात. लक्षात ठेवा जितका हुशार माणूस तुम्ही कामावर ठेवल तेवढा तो तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि तुम्ही पुढे जाताना त्याला जर सोबत घेऊन चालल तर तुम्ही आणखी पुढे नक्कीच जाणार.

“Innovation distinguishes between a leader and a follower.” म्हणजेच तुम्हाला नेतृत्व करायचे आहे की कोणाचा Follower म्हणूनच जगायच आहे हे ठरवते तुमची नवनवीन गोष्टी करण्याची जिद्द.

Build strong relationships: व्यवसाय उद्योगात तुम्हाला भेटणाऱ्या लोकांसोबत चांगले संबंध तयार करत चला. कारण कोणते relation कधी कुठे कसे कमाल येईल सांगता येत नाही.

Stay ahead of the competition:

स्पर्धेत नेहमी पुढे रहा.

आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे, या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल तर आपण नेहमी एक पाऊल पुढे असयला हवे. आज आपल्याला कोणी competitor नाही म्हणजे कधीच नसेल अस नाही. भविष्यात काय अडचणी येऊ शकतात ते आजच पडताळून पहा, त्याचे योग्य नियोजन करा.

Never stop dreaming big: मोठी स्वप्न पाहणे कधीही थांबवू नका. Vision (ध्येय), Ambition (महत्वाकांक्षा) आणि चिकाटी या गोष्टी तुम्हाला यशाकडे घेऊन जातात.

व्यवसाय म्हणजे आपल्या आयुष्यातील काही वर्ष असे जगने की जसे सगळे जगत नाहीत ज्यामुळे तुमचे उर्वरित आयुष्य असे असेल की जसे दुसरे जगू शकत नाहीत.

या महत्वाच्या टिप्स तुम्हाला तुमच्या यशस्वी वाटचालीत नक्कीच मदत करतील.

Blog आवडल्यास share नक्की करा.   

यांचे नवनवीन blog वाचत राहण्यासाठी भेट देत रहा.

आपला अभिप्राय comment करा.

Importance of Gesture and Posture in Public Speaking & Business Meetings.

Follow us on instagram

3 thoughts on “How important is public speaking for entrepreneurs?”

 1. व्यवसाय वाढीसाठी योग्य मार्गदर्शन लाभले ,
  आभार…………..

  Reply

Leave a Comment