We are forgetting these beautiful ‘Marathi words’.

अडगळीतले मराठी शब्द (मराठवाडा, ग्रामीण)

आजचे युग हे इंटरनेट चे युग आहे असे म्हटले जाते. या इंटरनेट ने अगदी खेडीपाडी, वाडी वस्त्या एकमेकांशी जोडल्या. अगदी शेतात काम करणारा शेतातील मजूर असो की मग एखादा गुराखी अगदी एक क्लिक वर दिल्ली मध्ये काय सुरू आहे हे पाहू लागला आहे.

जग बदलल तशी बोलीभाषा बदलायला लागली. काही लोकांच्या डोक्यात प्रमाण भाषेच भूत संचारल, आणि यामुळे बोलीभाषेतील काही शब्द अडगळीला पडायला लागली. आपण अश्याच काही शब्दांचा संग्रह पाहणार आहोत. तुम्ही देखील तुम्हाला माहिती असलेले असे शब्द कमेंट मध्ये टाकू शकतात.

उजाड: प्रकाश
उदा: सूर्य उगला (उगवला) की उजाड पडल.

झुंजुरका: पहाटे
उदा: उद्या झुंजुरकाच गावाला निघू.

तामटाच्या आत: पहाटे
तामटाच्या आत शेतकड जावू.

इळानमाळ: दिवसभर / संपूर्ण दिवस
उदा: लेकरू इळानमाळ उपाशी हाय. (मूल दिवसभर उपाशी आहे.)

राच्च: रात्रीच

उदा:राच्च इच्चु काट्याच भ्या (भीती) असतं.

अमुश्या: अमावस्या
उदा: आज अमुश्या हाय, राच्च बाहेर निघू नकू.

इळानमाळ: दिवसभर / संपूर्ण दिवस
उदा: लेकरू इळानमाळ उपाशी हाय. (मूल दिवसभर उपाशी आहे.)

आज आडदी: एक आठवड्यापूर्वी आजच्या दिवशी

बुधारी: बुधवारी

अजून: आणखी
उदा: अजून लाईट आली नाही. (आणखी लाईट आली नाही.)

वाढूळचा: केव्हाचाच
उदा : म्या वाढुळचाच येऊन बसलो, तुमचाच काय पत्ता. (मी केव्हाच आलो आहे, तुम्हीच उशिरा आले)

निचेतीन: सावकाश

गुमान: मुकाट्याने
उदा: जे भेटतय ते गप गुमान खा.

कव्हर: किती वेळ
उदा: कव्हर वाट बघत बसु? (किती वेळ वाट पाहत थांबू?)

बिगिनं: लवकर

भायर: बाहेर

यरवाळी / येरळी: हा शब्द दोन ठिकाणी वापरतात.

  1. सकाळी लवकर. उदा: आज येरळीच उठून शेतात गेलो.
  2. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी. उदा: यरवाळी घराकड या. (संध्याकाळी लवकर घरी या.)

औंदा: यावर्षी
उदा: औंदा पाऊस बरा पडायला पाहिजे.

शीव: गावाची हद्द

पल्याड: पलीकडे

आल्याड: अलीकडे

माडी / माढी: घराचा वरचा मजला

देवळी: घराच्या भिंतीत वस्तु ठेवण्यासाठी तयार केलेला कप्पा

भीताड: भिंत

कवाड: दरवाजा

न्हाणी: बाथरूम (स्नानग्रह)

परसाकड: बाथरूम ला

हापशी: हातपंप

बासण: भांडे

केरसुणी: झाडू

पाटी: टोपली

दुरडी: भाकरी ठेवायची टोपली

सांडशी: पक्कड

डांब: खांब / पोल

इस्तू: विस्तव

धुपण: धूर

मार्तुल – स्क्रू ड्रायव्हर

गोळा: बल्प

इस्तरी: इस्त्री

बाचक / चुंगड: धान्याचे छोटे पोते

शिशी: बाटली
उदा: तेलाची शिशी घेऊन ये दुकानातन

मायचान : आई शपथ
उदा: मायचान खर बोलतोय र.

आण: शपथ

महयावल / तुहयावाल : माझ / तुझ
उदा: महयावल शर्ट नाय हे तुहयावाल हाय.

गचांडी: गळा दाबणे, पकडणे

नैतरणा: तरुण
उदा: नैतरणा गडी असून असा का गळून बसलास.

किंवडा: बहिरा
उदा: कितिवेळचा आवाज देतोय एकू येत नाही का? किंवडा हाइस का?

चाभरा: खूप बोलणारा

बुरसो: घाणेरडा वा पारोसा (आंघोळ न केलेला)

निजणे: झोपणे

कोडग: निगरगट्ट, निर्लज्ज

अडगा: अडाणी

नादार: सुंदर

आडमुठं: दादागिरी करणारा
उदा: आडमुठ हाय ते, त्याच नदाला नग (नको) लगायला.

इपीतर: अवखीळ / खोडकर
उदा: इपीतर बेन हाय ते. (अवखीळ मुलगा आहे तो)

मढ: प्रेत

उलसक / उलशीक : किंचित / थोडेसे
उदा: जेवण वाढताना ग्रामीण भागात खालील वाक्य एकायला मिळते.
उलशीक घ्या अजून त्यात काय होतय. (आणखी घ्या थोडेसे, काही होत नाही.)

उली उली: थोड थोड

मोहर / म्होर: पुढे.
उदा: जरा म्होर गेल की लगीच गाव येईल.

बिगिन: लवकर

घावल / गावल: आढळले, सापडले
उदा: शेतात जात असताना मला दहा रुपये गावले (सापडले).

हेलपाटा: फुकट झालेली चक्कर. (काम न होता परतने)
उदा: साहेबच आले नव्हते म्हणून कचेरीत उगाच हेलपाटा झाला.

गवसणे: शोधणे

माळव: भाजीपाला

भुरकी : लाल तिखट

वशाट : चिकन / मटन

खर्डा : मिरचीचा ठेचा

गरा : रवा

जांब: पेरू

सयपक: स्वयंपाक

कोरडयास / कोडयास: ओली भाजी

खंगाळून: स्वच्छ करून.
उदा: बासण तेवढे खंगाळून घे.

टकुच: बाळाची टोपी

कुडत / आंगड: शर्ट / सदरा

खमिस: शर्ट / सदरा

इजार: पॅन्ट

खेटर: बूट

पायतान: चप्पल / बूट

गुंडी: शर्टचे बटन

काउण / कऊन : कशामुळे

वळकील का?: ओळखल का?

ईस्कटून: पसरवून / सुटसुटीत
उदा: मला काही समजणा काय बोलायलास जरा ईस्कटून सांग.

गिण्यान: ज्ञान
उदा: तोह गिण्यान काय मातीत गेल का?

कोंगाडी: न समजणारी भाषा

दाव: दाखव

निजला: झोपला

हाथरून: अंथरूण

उकांडा : उकिरडा

खकाणा: धूळ

फुपाटा: धुळ

माय: आई

मावळण: आत्या

इवाही: व्याही

मालक: नवरा मालकीण: बायको

वरधावा = नवरदेवाचा लहान भाऊ

कलरी: कलवरी (नवरी / नवरदेवाची बहीण)

परण्या: लग्न लागण्याच्या पहिले नवरदेव वाजत गाजत मारोतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो.

डोरल: मंगळसूत्र

मंजी: म्हणजे

हाळी:  हाक
अब्दा: हाल किंवा गैरसोय
मायंदाळ: पुष्कळ / भरपूर / जास्त
हपकून जाणे: हिंमत खचणे
हुद्दा: काम / उद्योग
बेजार / बेजरी: दगदग
हाटकून: मुद्दामहून
हब्रेड: हायब्रिड
कालवड / कार्हड : लहान गाय
गोऱ्ह: लहान बैल
वघार: लहान म्हैस
हल्या: रेडकू

महाराष्ट्रात दर कोसला भाषा बदलते अस म्हणतात. त्यामुळे तुम्ही जिथे राहता तिथे वेगळे शब्द असू शकतात. तुम्ही देखील तुमच्या गावाकडील शब्द आम्हाला पाठवू शकता, ते या पोस्ट मध्ये समाविष्ट केले जातील.


Old Marathi words.
Marathi words from marathwada.
traditional marathi
marathwadyachi marathi

जुने मराठी शब्द
मारठवड्यातील प्रसिद्ध मराठी शब्द
मारठवड्याची मराठी
मराठी शब्द
learn marathi
marathi meaningful words. how to speak marathi

follow us on twitter: click here

Our FB Page

2 thoughts on “We are forgetting these beautiful ‘Marathi words’.”

Leave a Comment