Some Marathi Proverbs You Have Never Heard

Marathi proverbs, Marathi idioms

मराठी म्हणी

लहानपणी भांडण झाली की आपसूक शब्द यायचा चोर तो चोर वर शिरजोर किंवा आई म्हणायची आपला तो बाब्या, लोकाचं ते कार्ट. शाळेत असताना केलेले म्हणीचे पाठांतर असो की मग गुरुजींचा मार खाताना छडी लागे छम छम ची आठवण असो. म्हणी वाक्यप्राचार यांचा प्रवास आपल्या जीवन प्रवाससोबत सुरू असतो.

Unique Marathi proverbs

लहानपणी पाठ केलेल्या म्हणी पुढे आयुष्यात कश्या तंतोतंत खऱ्या ठरतात हे अनुभवातूनच काळत.
ज्या म्हणी 10 वेळा घोकून पाठ होत नाहीत त्या म्हणी आयुष्यातील एक प्रसंगच असा शिकवून जातो की परत आपण ती म्हण काही विसरत नाही.
अगदी ऑफिस मध्ये काल आलेला जूनियर जेव्हा आपल्या वरचढ होताना, कान मागून आली आणि तिखट झाली म्हण असेल किंवा संसार करत असतानाचे अरे संसार संसार असेल.. हे शब्द अगदी आपसूक निघतात.

मोजक्या शब्दात खूप काही सांगून जाणाऱ्या अश्या ह्या म्हणी आज आपण पाहणार आहोत.

इथे शक्य तेवढ्या नवीन आणि वेगळ्या म्हणी आपण दिल्या आहेत. रोजच्या म्हणी तर सर्वानाच माहिती आहेत, पण आपण इथे वेगळ्या काही म्हणी पाहू.

अडाण्याचा गेला गाडा, वाटेवरची शेती काढा.
अक्कलशून्य माणूस कधीही आणि कुठलीही मागणी करू शकतो किंवा वर्तन करू शकतो.

अगं अगं म्हशी मला कुठे नेशी?
चूक एकाची असताना इतराना देखील त्यामुळे दोषी ठरवणे.

Marathi proverbs

आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार
जर एखादी गोष्ट वरिष्ठ मंडळी कडेच नसेल तर त्याची कानिष्ठा कडून अपेक्षा करू नये.
पालकांकडेकच एखादा गुण नसेल तर मुलांकडे कुठून येणार असा पण अर्थ होतो.

आज लगीन की उद्या लगेच पोर खेळवायला पाहिजे.
एखादे काम केले की लगेच त्याचा मोबदला मिळण्याची अपेक्षा करणे.

रोज घालतय शिव्या आणि एकादशीला गातय ओव्या
सतत एखादी वाईट गोष्ट करत राहायची आणि एखाद्या दिवशी चांगल्या गोष्टी करण्याचे सोंग आणणे.

बडा(मोठे) घर पोकळ वासा आणि वारा(हवा) जाई भसा भसा.
मोठेपणाचा दिखावा करणे, पण सत्यात काहीच नसणे.

चोराला चावला इच्चु, तरी तो करत नाही हुका चु
आपल्याकडून एखादी चूक झालेली इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून शांत राहणे.

दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत.
कुठलाही काम धंदा न करता अस दकवणे की खूप काम आहे किंवा फुकटचे काम करत राहणे.

दक्षिणा तशी प्रदक्षिणा
जिथे आपला स्वार्थ दिसतो तिथे पुढे पुढे करणे.

दात आहेत तर चणे(फुटणे) नाहीत चणे(फुटणे) आहेत तर दात नाहीत.
आपल्याकडे एक गोष्ट असली की दुसरी नसणे.

दांत कोरून पोट भरने
कठीण परिस्थित जगणे

दाम करी काम.
हातात पैसा असेल तर कोणतेही काम आपण सहज करून घेऊ शकतो.

दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
एखाद्याला उगाचच खूप मोठा सल्ला देणे जो त्याच्याकडून करणे शक्य होणार नाही.

दिंडी दरवाजा (Main Gate) उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा
मोठे मोठे प्रश्न असताना एखाद्या छोट्याश्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात जास्त वेळ वाया घालवणे.

दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
वेळ असताना बसून राहणे आणि नको त्या वेळेला काम करणे.

जुने पण सुंदर मराठी शब्द

आला भेटीला धरला वेठीला.
एखाद्याची चूक नसताना देखील फक्त समोर दिसला म्हणून विनाकारण वेठीस धरणे.

आगीशिवाय धूर दिसत नाही.
कुठलीही घटना घडली म्हणजे त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असते.

अती परिचयात अवज्ञा
कोणाशी जास्त जवळीक पण चांगली नसते.

वाड्याचे तेल वांग्यावर
चूक एकाची असताना दुसऱ्यावर राग काढणे.

पडत्या फळाची आज्ञा.
एखादी गोष्ट स्वतःलाच करायची असते पण निमित्त दुसऱ्याला करायचे.

नावडतीचं मीठ अळणी.
जर एखाद्या व्यक्तिविषयी मनात द्वेष असेल तर त्याने कितीही चांगले केले तरी आपलीला वाईटच दिसणे.

घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं.
आपल्या स्वतःचीच काम भरपूर असताना इतर व्यक्तीने त्याचेपण काम आपल्यावर सोपवणे.

दुभत्या गा‌ईच्या लाथा गोड.
जर एखाद्या व्यक्तिपासून फायदा होत असेल तर त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे.

देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
काहीही गरज नसताना उगाचची उठाठेव करणे. गरज नस्तानची काम करणे.

देह देवळात चित्त पायतणात.
शरीराने एक जागी असणे आणि मनाने इतर ठिकाणी असणे.

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
एक लक्ष न ठेवता दोन लक्ष ठेऊन काम करणे आणि एकात पण यश न मिळणे.

लाखा शिवाय बात(गोष्ट) नाही अन् वडापाव शिवाय खात नाही.
स्वतःकडे काहीही नसताना उगचच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणे.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
चुकीच्या माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवीतला देखील धोका होऊ शकतो.
unique marathi proverbs

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे
एखादा मदत करत असताना त्याला आणखी मदत कर म्हणून सांगणे.
किंवा याला आणखी एक पर्यायी म्हण आहे.
बोट दिले की हात धरणे.

अंधारात केले पण उजेडात आले.
आपण कितीही लपवून एखादी गोष्ट गेली तरी ती कधी ना कधी बाहेर येतेच.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
एखादी व्यक्ति मुळातच आळशी असणे आणि त्यात तिला काम न करण्यासाठी कारण मिळणे.

आंधळ्या बहीऱ्यांची गाठ
एखाद्या कठीण अवघड वेळी एक दुसऱ्याना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या माणसांची भेट होणे.

आपला हाथ जगन्नाथ
आपली प्रगती ही आपल्याच हातात असते.

असेल त्या दिवशी दिवाळी, नसेलकी शिमगा
पैसा आला की मौज मजा करून उडवायचे आणि नसले की उपाशी बसायचे.

अंगठा सुजला म्हणून डोंगर एवढा होत नसतो.
कुठल्याही गोष्टीला एक ठराविक मर्यादा असते, त्याच्यावर ती जाऊ शकत नाही.

आजा मेला आणि नातू झाला
नुकसान आणि फायदा सोबतच होणे.

उकराल माती तर पिकतील मोती
मेहनत केली तरच फळ मिळते.

उधरीचे पोते, सव्वा हात रिते
उधरीने आणलेला माल कधीच पूर्ण भरत नाही आणि त्याची तक्रार पण करता येत नाही.

ऊसाच्या पोटी कापूस
चांगल्या माणसाच्या पोटी दुर्गुणी आपत्य जन्मने

केळी खाता हरखले, हिशेब देता चिरकले
एखाद्या गोष्टीचा उपभोग घेताना विचार न करणे आणि त्याची किंमत चुकवताना नाकी नऊ येणे.

नाकी नऊ येणे.
एकाद्या गोष्टीसाठी बेजार होणे.

कोल्हा काकडीला राजी
गरजवंत काशासाठीही होकार देतो.

खाई त्याला खवखवे
जर आपण काही वाईट काम केले असेल तर त्याची धास्ती घेणे.

खाऊन माजवे, टाकून माजू नये.
पैसा, संपत्ती, सत्तेचा गैरवापर करू नये.

खोट्याच्या कापळी गोटा
जर कोणी वाईट काम करत असेल तर त्याला कधी ना कधी त्याचे फळ मिळतेच.

घर ना दार देवळी बिऱ्हाड
कोणतीही जबाबदारी नसणारी व्यक्ती.

चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला
मुख्य गोष्टीला कमी आणि किरकोळ गोष्टीला जास्त खर्च लागणे.

घेत दिवाळी देता शिमगा
मदत / पैसा घेताना चांगल वाटत पण परत करताना वाईट वाटते.

चार जणांची आई बाजेवर जीव जाई.
एक गोष्टीची जबाबदारी एक पेक्षा जास्त जनावर असेल तर कोणीच काळजी घेत नाही. प्रत्येकाला वाटत दुसरा करेल.

चिंता परा येई घरा
दुसऱ्याचे वाईट होण्याची कामना केली की आपलेच वाईट होते.

चुलीपुढे शिपाई घराबाहेर भागूबाई
मागे मोठ्या मोठ्या गोष्टी करणे आणि येणवेळी पळ काढणे.

जशी देणावळ तशी धुनावळ
जेवढा मोबदला तेवढेच काम.

देखल्या देव दंडवत
समोर दिसले म्हणून तोंडपूरती विचारपूस करणे.

पायाचे वाहन पायीच बरे
ज्याला त्याला ज्याच्या त्याचा येपाती प्रमाणे ठेवणे.

बावली मुद्रा देवळी निद्रा
दिसायला जारी बावळट वाटत असला तरी चतुर असणार व्यक्ति.

कोंबड झाकल म्हणून तांबड फुटायच राहत नाही.
कोण शिवाय कोणाच काहीही काम आडात नाही.

रंग जाणे रंगारी
ज्याचे काम त्यालाच जमते

रात्र थोडी सोंगे फार
कमी वेळेत खूप सारे काम असने.

लकडी शिवाय मकडी वठणी येत नाही.
कधी कधी पाहिजे तिथे आपला हिसका दाखववच लागतो, त्याशिवाय काम होत नाही.

लेकी बोले सूने लागे
एकला अश्या पद्धतीने उदेशून बोलणे की दुसऱ्याला लागेल.

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
आपल्या आवश्यक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून न राहणे.

सारा गाव मामाचा अन एक नाही कामाचा
फक्त सांगायला ओळखी खूप असणे पण कामाच्या वेळी एक पण उपयोगी न येणे.

होळी जळली आणि थंडी पाळली
एखादा उपाय केला आणि होणार त्रास बरा झाला.

तुम्हाला माहिती असेलेल्या म्हणी तुम्ही comment मध्ये टाकू शकता.

follow us on twitter: DostMaza

Read our latest blogs on DostMaza.com
Follow us on Facebook: Dostmaza

Leave a Comment