Adhik Mahina 2023: अधिक महिना म्हणजे काय? याला पौराणिक आधार काय आहे?

अधिक मास / अधिकचा महिना किंवा धोंडयाचा महीना म्हणजे काय?

या वर्षी अधिकचा महिना हा 18 जुलै पासून सुरू होत आहे आणि 16 ऑगस्ट ला संपणार आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास पण म्हटले जाते.

Adhik Maas 2023:

या वर्षी श्रवण महिन्यामध्ये अतिरिक्त म्हणजे अधिक महिना आलेला आहे. यामुळे श्रवण महिना या वर्षी 59 दिवसांचा असणार आहे. प्रत्येक तीन वर्षा नंतर एक महिना जास्तीचा महणजे आधीक असतो, त्याला आपण अधिक मास म्हणतो. अधिक मास / महिन्यामुळे वेळेची स्थिति योग्य होत असते.

अधिक महिना म्हणजे काय?

इंग्रजी वर्षामध्ये  प्रत्येक वर्षी बारा महीने असतात. परंतु पंचांगा नुसार प्रत्येक तीन वर्षांमध्ये एक वर्ष हे अतिरिक्त महिन्याचे असते, ज्याला आपण अधिकाचा महिना / धोंडयाचा महिना किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात.  अधिक महिन्यात पूजा-पाठ, व्रत, साधन यांचे महत्त्व अधिक असते. तुम्हाला माहिती आहे का की अधिक महिना प्रत्येक तीन वर्षात का आणि केव्हा येतो ते. तुम्हाला जाणून घायल आवडेल का?

कधी सुरू होतो अधिक महिना?

पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर नुसार, सूर्य वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि चंद्र वर्षामध्ये 354 दिवस असतात. त्यानुसार सूर्य आणि चंद्र वर्षामध्ये 11 दिवसांचे अंतर असते आणि तीन वर्षांमध्ये हे अंतर 33 दिवस होतो. हेच 33 दिवस तीन वर्षामध्ये एक अतिरिक्त महिना होतात, ज्याला आपण अधिक चा महिना म्हणतो. हा महिना चालू एका महिन्याशी जोडला जातो. जसे के या वर्षी श्रावण महिना हा अधिक चा महिना आहे. यामुळे व्रत-उपवास, सण उत्सव यांच्या तिथीची स्थिति अनुकूल बनते आणि कालगणना उचित ठेवण्यात मदत होते.

या वर्षी अधिकच महिना हा श्रावण महिना आलेला आहे. यामुळे श्रावण या वर्षी दोन महीने असणार आहे. आधीकच्या महिन्याची सुरवात ही 18 जुलै 2023 पासून होत आहे आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी अधिक मास संपणार आहे.

अधिक महिन्याला / धोंडयाच्या महिन्याला पौराणिक आधार काय आहे?

अधिक महिन्या संदर्भात पौराणिक कथे नुसार, एकदा दैत्यराज (असुरांचा राजा) ने कठोर तपश्चर्या करून ब्रम्ह देवाला प्रसन्न केले, प्रसन्न केल्या नंतर हिरण्यकशपुने अमर होण्याचे वरदान मागितले. परंतु अमरतेचे वरदान निषिद्ध असल्यामुळे ब्रम्हदेवा ने दुसरे वरदान मागण्यासाठी हिरण्यकशपूला सांगितले.

तेव्हा  हिरण्यकशपुने ब्रम्ह देवाला सांगितले की, मला असे वरदान दया की, मला या संसारातील कोणताही नर(पुरुष), नारी (स्त्री), पशू, देवता, दैत्य दानव, असुर यापैकी कोणीही मारू शकणार नाही. वर्षातील बारामहीन्यात कधीही मृत्यू प्राप्त होणार नाही. त्याचा मृत्यू दिवसा होणार नाही आणि रात्री पण होणार नाही. तो कोणत्याही अस्त्र किंवा शस्त्राने मारणार नाही. त्याला नाही घरात मारले जाईल ना घराच्या बाहेर मारले जाईल. ब्रह्म देवाने हिरण्यकशपूला हे वरदान दिले.

हे वरदान मिळताच हिरण्यकशपुने स्वतःला अमर समजण्यास सुरवात केली आणि स्वतःला भगवान समजू लागला. तेव्हा भगवान विष्णु ने अधिक महिन्यात नरसिंह (अर्ध मानव आणि अर्ध सिंह) अवतार घेतला. संध्याकाळ च्या वेळी दरवाजा मध्ये आपल्या अंकुचीदार नखांनी हिरण्यकशपू ची छाती फाडली आणि त्याला मृत्यू दिला.

अधिक महिन्याचे विशेष महत्व:

हिंदू धर्मा अनुसार, या पृथ्वीतला वरील प्रत्येक जीव हा पंचमहाभूता (जल, अग्नि, आकाश, वायु आणि पृथ्वी) पासून तयार झालेला आहे. अधिक महिना हा काळ धार्मिक कार्यासोबतच चिंतन – मनन, ध्यान, योग करण्याचा काळ असतो, यामुळे व्यक्ति आपल्या शरीरात सामावलेल्या या पंचमहाभूतांवर संतुलन स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे अधिकमास च्या दरम्यान केलेले कार्य हे तीन वर्षांमध्ये व्यक्तिमध्ये नवी ऊर्जा भरत असतात.

अधिकच्या महिन्यात जावयाला का सोन आणि कपडे करतात?

आपला भारत देश हा अनेक सनवार उत्सव परंपरा नी भरलेला आहे. आपल्याकडे प्रत्येक महिन्याला कोणता तरी सन असतो आणि त्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशे दोन्ही महत्त्व असतात. प्रत्येक सन साजरा करण्याची आपली आपली अशी वेगळी पद्धत असते, रीत असते. असाच अधिक चा महिना देखील जावई लोकांसाठी खास असतो, ज्याची तीन वर्ष वाट पहिली जाते.

अधिक मास मध्ये शक्यतो लग्न असेल किंवा मुंज अशे कार्यक्रम केले जात नाहीत.

या महिन्यात व्रत वैकल्य, उपास – तापास, दान धर्म मोठ्या प्रमाणात केले जातात. या मागे अशी आख्यायिका आहे की आपण जितके जास्त दान करू त्याच्या दोन पट आपली वृद्धी होत असते. त्यामुळे या दानाला अधिक असे महत्व आहे.

आधिक महिन्यात सूर्य हा एक राशी मधून दुसऱ्या राशी मध्ये जात नाही. हा महिना अधिक म्हणजेच जास्तीचा असल्यामुळे या महिन्याला कोणताही स्वामी नसतो. तीमुळे श्री विष्णु भगवान यांनी या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले आहे. आणि श्री भगवान विष्णु यांचे दुसरे नाव हे पुरुषोत्तम देखील आहे, यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास पण म्हणतात. अधिक महिन्यात मनात कोण साठीही नकारात्मक भावना ठेऊ नये. प्रत्येकाचे भले व्हावे यासाठी प्रार्थना करावी. भगवंताचे नाम जपावे, धन धर्म करावा. योग्य चिंतन मनन करावे.

जावई बापू ला केले जाते धोंडे दान.

अधिकच्या महिन्यामध्ये जावई आणि लेकीस धोंडे दान केले जाते म्हणून याला धोंडयाचा महिना देखील म्हणतात. धोंडे म्हणजे काय हे आज कालच्या पिढीला समजत नाही तर आपण पाहूया की धोंडे दान म्हणजे नेमका हा काय प्रकार आहे ते.

आपण वर पहिले की या महिन्याचा स्वामी हा विष्णु भगवान आहेत, आणि त्यामुळे भगवान विष्णु म्हणजेच पुरुषोत्तम देवाची पूजा अर्चना केली जाते.

मुलगी आणि जावई हे आपल्याकडे लक्ष्मी आणि नारायण म्हणून समजले जातात. म्हणजेच काय तर जावईला भगवान श्री विष्णु व लेकीला लक्ष्मी म्हणून धोंडे दान केले जात असते. धोंडे म्हणजे एक गोड पदार्थ असतो तो जेवणाच्या मेनू मध्ये बनवला जातो. धोंडे हे प्रदेशा नुसार वेगवेगळे असतात. काही ठिकाणी तुपात तळलेले अनारसे, बतासे किंवा म्हैसूर पाक दिला जातो. तर काही ठिकाणी गोड पुराण मध्ये घालून मोदका सारखे गोल करून टाळून धोंडे तयार केले जातात. आणि हे जेवण जावई आणि लेकीला खाऊ घातले जाते. त्यासोबत आता काळा नुसार काही चाली रिती बदलत गेल्या. आता जावई आणि लेकीला कपडे केले जातात, सोन्याचा दागिना भेट म्हणून दिला जातो.

जर एखाद्याला मुलगी नसेल तर जवळच्या नातेवाईका ला किंवा ब्रह्मणाला जेवू घातले जाते. अश्या पद्धतीने अधिकच महिना साजरा केला जातो.

थोडक्यात काय तर अधिक मास म्हणजे असा महिना ज्या मध्ये नातेवाईक आपतेष्ट स्नेही एकत्र येतात नाते संबंध घट्ट करतात, सुख असेल किंवा दुख: ते एक मेकांशी वाटून घेतात. एकमेकांना सांभाळून घेतात. यामुळे स्नेह भाव वाढीस लागतो.

या महिन्यात काय करू नये.

 या महिन्यात सूर्याची स्थिति प्रतिकूल असल्याचे मानले जाते. सृष्टि मलिन झाल्यासारखी भासते म्हणून या महिन्याला मल मास / महिना देखील म्हणले जाते. त्यामुळे या महिन्यात नवीन कार्य हाती घेतले तर ते पूर्ण होईलच असे नाही, अशी एक धारणा आहे. तसेच अधिक महिना हा बऱ्याच ठिकाणी शुभ नाही असा समज आहे.

जीआय टॅग

हे करू नका.

लग्न कार्य, मुंज, साखरपुडा असे मंगल कार्य करू नये.
नामकरण, जावळ, यज्ञोपवित, कान टोंचणे, ग्रह प्रवेश यासारखे शुभ कार्य टाळा.
या महिन्यात ग्रह खरेदी, वस्तु खरेदी, मोठी गुंतवणूक टाळावी.
शुभ मुहूर्त असल्यास दागिने खरेदी करता येऊ शकते.
नवीन ठिकाणी देव दर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या ठिकाणी दर्शनाला जावे किंवा घरातील देवांची पूजा अर्चना करावी.
वाईट शब्द, घरतातील वाद, राग, असत्य बोलणे, शरीर संबंध टाळा.

लेख आवडल्यास शेअर  नक्की करा.

facebook page

1 thought on “Adhik Mahina 2023: अधिक महिना म्हणजे काय? याला पौराणिक आधार काय आहे?”

Leave a Comment