दहावी (SSC) नंतर पुढे काय? What next after 10th?


दहावी बारावीला आयुष्याचा Turning Point म्हटले जाते. या दोन ठिकाणी आपण काय निर्णय घेतो या वर आपले पुढील शिक्षण करियर आणि त्यापुढील आयुष्य बऱ्याच अर्थी अवलंबून असते. या टप्पावर बऱ्याच मुलांना योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर पुढे चालून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

आपण येथे दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेऊ शकतो हे पाहणार आहोत. तुम्ही तुमचा interest कश्या मध्ये आहे, आपली बौद्धिक, आर्थिक आणि इतर महत्वपूर्ण गोष्टी पाहून कोणते आणि कुठे शिक्षण घायचे हे ठरवू शकता.

दहावी नंतर आपण जो अभ्यासक्रम / कोर्स करणार आहोत त्याची संपूर्ण माहिती घ्यावी. मित्राने / मैत्रिणीने ऍडमिशन घेतले म्हणून आपण घ्यायचे हे टाळा.
पुढील गोष्टी ऍडमिशन करण्याआधी जरूर तपासा.
आपल्याला ज्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन घायचे आहे त्याची संपूर्ण माहिती करून घ्यावी. जसे कि, त्या अभ्यासक्रमाचे कॉलेज / इन्स्टिटयूट कुठे कुठे आहेत, कोणते आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज उपलब्ध आहेत का? आहेत तर त्याचा मागील वर्षीचा कटऑफ (Cut Off) काय होता. सदर कॉलेज / इन्स्टिटयूट ची फीस किती आहे? किती टप्प्यामध्ये हि फीस भरावी लागेल. हॉस्टेल ला राहण्याची गरज असेल तर त्याची फीस काय आहे? सदर कॉलेजचे placement कसे आहे.

आपण ज्या कोर्स / अभ्यासक्रमाला ऍडमिशन करणार आहोत त्याचे 3 वर्षानंतर भविष्य काय असेल. (यासाठी त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीला भेटून बोलणे योग्य असते.)


पदविका कोर्स (Diploma)

तुम्ही पुढील क्षेत्रात पदविका (Diploma) पूर्ण करू शकता, अभियांत्रिकी (Computer, IT, Electrical, Mechanical, Civil, Automobile, Chemical Etc.), फार्मसी, पॅरामेडिकल, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ऍनिमेशन, डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी. तुमचे दहावीचे गुण चांगले असतील तर तुम्ही गव्हर्नमेंट पॉलीटेकनिक च्या माध्यमातून अत्यल्प शुल्कामध्ये अभियांत्रिकी पदविका पूर्ण करू शकता. गव्हर्नमेंट पॉलीटेकनिक कॉलेज आपल्या जिल्हाच्या ठिकाणी असते.

व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational Courses): महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान (Information Technology), आदरातिथ्य (Hospitality), पर्यटन (Tourism), रिटेल व्यवस्थापन (Retail Management), ऑटोमोबाईल, सौंदर्य आणि निरोगीपणा (Beauty and Wellness), इलेक्ट्रिकल वर्क, प्लंबिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि प्रशिक्षण प्रदान करणारे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

आय. टि. आय. (Industrial Training Institutes (ITIs)):
ITI इलेक्ट्रीशियन (Electrician), वेल्डिंग (Welding), फिटिंग (Fitting), प्लंबिंग (Plumbing), सुतारकाम (Carpentry), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), कॉम्प्युटर हार्डवेअर (Computer Hardware), मेकॅनिक (Mechanic) इत्यादी व्यवसायांमध्ये कौशल्य-आधारित प्रशिक्षण देतात. या अभ्यासक्रमांमुळे प्रमाणपत्र आणि रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस):
ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती मुळे पुढील शिक्षण पूर्ण करणे शक्य होत नाही ते National Institute of Open Schooling (NIOS) अथवा मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करू शकतात.

कौशल्य विकास कार्यक्रम:
महाराष्ट्र सरकार आणि विविध संस्था कृषी, ​​हस्तकला (Handicrafts), ​​हातमाग (Handlooms), आरोग्यसेवा (Healthcare), सौंदर्य आणि निरोगीपणा इत्यादी क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम देतात. हे कार्यक्रम विशिष्ट व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर भर देतात.

आर्ट सायन्स कॉमर्स (Art, Science, Commerce):
आर्ट / सायन्स / कॉमर्स ज्याला आपण अकरावी बारवी म्हणतो. या तीन शाखा निवडताना देखील योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

आर्ट (ART):
आर्ट मध्ये काही वर्षांआधी असं होत कि कुठे ऍडमिशन नाही मिळाले म्हणून आर्ट घेतलं, किंवा मला इतर अभ्यासक्रम झेपणार नाही म्हणून आर्ट घेतलं. पण सध्या आर्ट या शाखेमधून पण भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची.

कॉमर्स (COMMERCE):
जर तुम्हाला बँकिंग क्षेत्राची आवड आहे, किंवा आपला पारंपरिक व्यवसाय आहे आणि तोच पुढे तुम्हाला सुरु ठेवायचा आहे किंवा तुम्हाला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर कॉमर्स क्षेत्र उत्तम पर्याय आहे. कॉमर्स मध्ये बारावी करून नंतर MBA करून तुम्ही चांगल्या पद्धतीची नोकरी मिळवू शकता.


विज्ञान (Science):
या शाखेचे नाव लहान जरी असलं तरी व्याप्ती खूप मोठी आहे. विज्ञान शाखेतून बारावी केल्या नंतर भरपूर कोर्सेस उपलब्ध आहेत. इथे आपण काही कोर्सेस बद्दल माहिती पाहू.
( अकरावी बारावी विज्ञान शाखेत विषयांची निवड विचारविनिमय करून घेतल्यास फायद्याचे ठरेल.)

अभियांत्रिकी (Engineering): तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इत्यादी विषयांमध्ये अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवू शकता. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश एमएचटी-सीईटी (MHT-CET), जेईई मेन (JEE Main) किंवा जेईई ऍडव्हान्स (JEE Advance) यासारख्या प्रवेश परीक्षेद्वारे होतो.

वैद्यकीय (Medical): तुम्हाला वैद्यकीय शास्त्रात रस असल्यास, तुम्ही MBBS, BAMS, BHMS किंवा BDS अभ्यासक्रम निवडू शकता. या अभ्यासक्रमांना प्रवेश NEET-UG सारख्या प्रवेश परीक्षेद्वारे दिला जातो.

फार्मसी (Pharmacy): फार्मासिस्ट होण्यासाठी तुम्ही फार्मसी (B.Pharm) मध्ये बॅचलर पदवी घेऊ शकता. फार्मसी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश हा साधारणपणे MHT-CET सारख्या प्रवेश परीक्षांवर आधारित असतो.

आर्किटेक्चर (Architecture): इमारतींचे डिझाईन आणि बांधकाम (Designing and constructing buildings) करण्यात रस असलेल्यांसाठी, आर्किटेक्चर (B.Arch) मध्ये बॅचलर पदवी घेणे हा एक पर्याय आहे. B.Arch प्रोग्राममध्ये प्रवेश NATA(National Aptitude Test in Architecture) or JEE Main (Paper 2) सारख्या प्रवेश परीक्षांवर आधारित असू शकतो.

कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स ( Computer Applications): कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि ऍप्लिकेशन्सच्या विविध पैलूंचा शोध घेण्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (BCA) किंवा बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स (B.Sc. कॉम्प्युटर सायन्स) मध्ये बॅचलर पदवी निवडू शकता.

कृषी (Agriculture): तुम्हाला जर शेतीची आवड आहे किंवा येणाऱ्या काळात या क्षेत्रातील संधी बघता कृषी क्षेत्रात शिक्षण घेणे खूप फायद्याचे आहे. तुम्ही B.Sc. Agriculture, B.Sc. Horticulture, किंवा B.Tech. Agricultural Engineering मध्ये पदवी पूर्ण करू शकता. या अभ्यासक्रमासाठी MHT-CET or ICAR-AIEEA सारख्या प्रवेश परीक्षा आहेत.


NDA : नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पात्रता निकष, अर्ज, लेखी परीक्षा आणि निवड प्रक्रियेसह अनेक पायऱ्यांचा समावेश होतो.
वयोमर्यादा: अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवारांचे वय 16.5 ते 19.5 वर्षे दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12th किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज कसा करतात:
NDA साठी अर्ज फॉर्म NDA परीक्षा आयोजित करणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध असतात.
उमेदवारांनी आवश्यक तपशीलांसह अचूकपणे अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असते.
विहित अर्जासह जे परीक्षा शुल्क असेल ते ऑनलाईन / ऑफलाईन भरू शकता.

NDA परीक्षेत दोन पेपर असतात: गणित (300 गुण) आणि सामान्य क्षमता चाचणी (600 गुण).
UPSC द्वारे परीक्षा वर्षातून दोनदा, साधारणपणे एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये घेतली जाते.
परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असून ऑफलाइन पद्धतीने (पेन आणि पेपर-आधारित) घेतली जाते.

वैद्यकीय तपासणी:

एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लष्करी अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते.
वैद्यकीय तपासणी उमेदवारांच्या शारीरिक आणि वैद्यकीय तंदुरुस्तीचे मूल्यांकन करते.
वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केलेले उमेदवारच एनडीएमध्ये प्रवेशासाठी पात्र असतो.

(इथे एक लक्षात घेणे महत्वाचे आहे कि, परीक्षेमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. अधिक माहितीसाठी UPSC & NDA चे अधिकृत संकेत स्थळ पाहावे.)

आणखी भरपूर कोर्सेस आज महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. येथे काही selected कोर्स आपण दिलेले आहेत याची नोंद घ्यावी.

नोट: वर दिलेली सर्व माहिती हि ऑनलाईन वेगवेगळ्या संकेतस्थळांचा अभ्यास करून एकत्रित केलेली आहे.
आपण एखाद्या विषयाशी निगडित अधिक माहिती जाणून घेऊ इच्छित असाल तर आम्हाला मॅसेज करू शकता किंवा कमेंट मध्ये तसे सुचवू शकता.
शक्यता आहे कि वेळेनुसार काही अभ्यासक्रमात बदल झालेले असतील.

धन्यवाद

दहावी नंतर पुढे काय पर्याय असतात?
दहावी करियरचा महत्वाचा टप्पा.
Courses available after SSC
Courses available after HSC
what after 10th in Marathi
NDA Admission process
Art Science Commerce in marathi
Entrance exam for MBBS

1 thought on “दहावी (SSC) नंतर पुढे काय? What next after 10th?”

Leave a Comment