Unique Marathi Phrases(मराठी वाक्प्रचार)

वाक्प्रचार म्हणजे शब्दांचा असा  समूह कि ज्यातून त्याच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ निर्माण होतो. वाक्प्रचार हा पूर्णवाक्य म्हणून किंवा नाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण किंवा शब्द योगी अव्यय म्हणून वाक्यामध्ये कार्य करतो.
वाक्प्रचारांची लांबी हि मर्यादित नसते, यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द असू शकतात. वाक्प्रचार हे वाक्याना विशेष वजन प्राप्त करून देतात. Unique Marathi Phrases(मराठी वाक्प्रचार)

आपण काही वाक्प्रचार पाहणार आहोत.

अक्काबाईचा फेरा येणे : अत्यंत बिकट परिस्थिति ओढवणे.
उदा: अककबाईचा फेरा आला आणि सगळ नाहीस झाल एका रात्रीत.

अडकित्यात सापडणे: कठीण परिस्थिति उडभवणे
उदा: दुष्काळमुळे मी अडकीत्यात सापडलो आहे.

आभाळ फाटणे: चारही बाजूनी न टाळता येणारी संकट येणे.
आभाळ कोसळणे: संकट येणे, बिकट परिस्थिति उद्भवणे.
उदा: घरात चोरी झाली आणि रामराव वर आभाळ कोसळल.

आभाळ ठेंगणे होणे: अत्यानंद होणे.
उदा: मुलगा MPSC पास झाला तर आई वडीलना आभाळ ठेंगण झाल.

अंग चोरणे: काम चुकारपणा करणे.
उदा: तो बैल औताला जुपला की अंग चोरतो.

आवसान गळणे: धीर सोडणे
उदा: ती बातमी एकली आणि माझ आवसान गळाल.

Unique Marathi Phrases(मराठी वाक्प्रचार)

अंग काढून घेणे: नामनिराळे होणे.
उदा: त्याच्यावर कामाची वेळ आली की तो अंग काढून घेतो.

अंगवळणी पडणे: एकाद्या गोष्टीची सवय होणे
उदा: रोज सकाळी उठून फिरायला जाणे आता माझ्या अंगवळणी पडले आहे.

आंदण देणे: आहेर देणे / भेट देणे.
उदा: त्यांनी मुलीला लग्नात फ्रीज आंदण म्हणून दिला.

आबाधित ठेवणे: जपून ठेवणे
उदा: आम्ही आजी-आजोबांच्या आठवणी आणखी अबाधित ठेवल्या आहेत.

आगळे वेगळे मराठी शब्द

इतिश्री करणे: अंत / शेवट करणे
उदा: .. आणि आज कार्यक्रमाचा इतिश्री झाला.

उर भरून येणे: अभिमान वाटणे / अतिशय आनंदी होणे / अभिमान वाटणे
उदा: पोरला आज साहेब झालेल पाहून आई-बापचा उर भरून आला.

उट्टे काढणे: बदल / सूड घेणे
उखळ पांढरे करणे: भरमसाठ फायदा करून घेणे.

उंटावरून शेळ्या(मेंढर) हाकणे: स्वतः काही कामधंदा न करता फक्त आदेश सोडणे.

उघड्यावर पडणे: निराधार होणे / कुठलाही आधार न राहणे
उदा: वादळाने चिमनीच घरात पडल आणि तिची पील उघड्यावर आली.

कच खाणे: धीर सोडणे
उदा: रामने शेवटच्या वर्षी कच खाल्ली आणि मार्क कमी पडले.

एरांडचे गुरहाळ गळणे: वायफल / व्यर्थ बडबडणे.

कढी पातळ होणे: घाबरगुंडि उडणे / थरकाप उडणे
उदा: पोलिसांना पाहून चोरांची कढि पातळ झाली

कळ करणे: मुद्दामहून एकाद्याची चाहडी करणे.
उदा: शाम ने राम ची मुद्दामहून गुरुजी कडे कळ केली.

कळस होणे: एखाद्या गोष्टीचा अतिरेक होणे
उदा: रोज रोज शाळेत उशिरा येऊन शामने बेशिस्तपणाचा कळस केला आहे.

कान टोंचणे : अचूक शब्दात समोरच्याला त्याची चूक लक्षात आणून देणे.
उदा: शाम शाळेत उशिरा येतो म्हणून गुरुजीने त्याचे चांगलेच कान टोचले.

कंठ दाटून येणे: गहिवरून येणे / रडायला येणे
उदा: आईला खूप दिवसांनी पाहून मिनाचा कंठ दाटून आला.

जीवाचा आटापिटा करणे: एखादी गोष्ट मनापासून करणे, तळमळीने करणे
उदा: जीवाचा आटापिटा करून आई ने बंडूसाठी खीर बनवली.

झळ लागणे: एखाद्या गोष्टीचा परिणाम होणे.
उदा: करोना मध्ये गरीब लोकांना जास्त झळ लागली.

कान फुंकणे: चहाडी करणे किंवा चुगली करणे
उदा: शाम शाळेत उशिरा येतो अस गुरुजीला राम ने सांगून कान फुंकले.

कीव येणे: दया येणे.
उदा: उषा ला आशा उपाशी आहे हे समजल्यावर त्याची कीव आली.

केसाने गळा कापणे: ज्याच्यावर विश्वास दाखवला त्यानेच विश्वासघात करणे
उदा: श्रीच्या मित्राने त्याचे पैसे परत न करून त्याचा केसाने गळा कापला.

खस खस पिकणे: मनापासून हसणे
उदा: राहुल ची झालेली फजिती पाहून सर्वांचीच खास खास पिकली

खडे फोडणे: दोषारोप करणे
उदा: तुम्ही त्यांच्या नावाने कितीही खडे फोडले तरी आता काही होणार नाही.

खाल्या मिठाला जगणे: ज्याने कधी काळी आपल्यावर उपकार केले होते त्याची परतफेड करणे.
उदा: श्यामराव च्या नोकराने संकट समयी त्यांचे प्राण वाचवून आपण खल्या मिठला जगलो हे दाखवून दिले.

खाजवून खरूज काढणे: मुद्दामहून भांडण करणे.
उदा: सर्व शांत झालेल अस्ताना रामु ने खाजवून खरूज काढली आणि परत भांडण झाल.

खो घालणे: एखाद्या गोष्टीला खोडा घालणे
उदा: काम व्यवस्थित सुरू असताना त्याला खो घालणे हे काही लोकांचे कामच असते

खडा टाकून पाहणे: अंदाज लावणे
उदा: त्या स्थळासाठी (लग्नाचे स्थळ) काही होते का ते एकदा खडा टाकुण पहा.

गळ्यात पडणे: एखाद्याचे मागे लागणे.
उदा: ती त्याला एकदा हसून बोलली तर तो तिच्या गळ्यातच पडला आहे

गळ्यातले ताईत होणे: जीव की प्राण होणे
उदा: विराट कोहली सध्या तरुणांच्या गळ्यातले टाईत झाला आहे.

गाशा गुंडाळणे: सर्व घेऊन चालते होणे.
उदा: तू केलेल्या चुकीला माफी नाही, चूप चाप आपला गाशा गुंडाळून चालते होयचे.

चितपट करणे: हरवणे
उदा: महेशला बोलण्यात कोणीच चितपट करु शकता नाही

छत्तीस चा आकडा असणे: कट्टर दुशमनी असणे
उदा: संजय आणि सुजाताचा एकमेकांसोबत छातीस चा आकडा आहे.

टेंभा मिरवणे: मिजाज दाखवणे.
उदा: आज काल काही लोक उगाचच टेंभा मिरवत आहेत.

ठसा उमटवणे: यश संपादन करून नावलौकिक करणे,
उदा: अतुल ने UPSC पास करून आपला ठसा उमटवला आहे.

डोळे झाक करणे: एकाद्या गोष्टकडे मुद्दाम दुर्लक्ष करणे
उदा: काही सरकारी अधिकारी, या गैरप्रकरकडे डोळेझाक करतात.

डोळ्यात अंजन घालणे: समोरच्याची चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
उदा: या घटनेने सरकारच्या डोळ्यात अंजन घातले आहे, आता तरी त्यांना जाग येईल का?

गमजा मारणे: मोठ्या मोठ्या गोष्टीं करणे. मोठ्या मोठ्या बाता मारणे
उदा: त्याच्याकडून काही होत नाही तो उगाच गमजा मरतो.

डुक धरणे: राग मनात ठेवणे
उदा: राहील ने साहिल वर विनाकारण डुक धरला आहे

डोळ्यात खुपणे: एखाद्या विषयी ईर्षा वाटणे
उदा: महेश च यश त्याच्या गावातील लोकांच्या डोळ्यात खुपत आहे

डोळ्याला डोळा न लागणे: झोप न येणे किंवा झोप उडणे
उदा: मुलाच्या भविष्याच्या काळजीने आईचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही.

तोंडघशी पडणे: अडचणीत सापडणे.
उदा: खोटे आरोप करून तोच तोंडघाशी पडणार आहे.

तोंड पडणे: नाराज होणे.
उदा: दहावीला कमी मार्क आलेले पाहून घरातील सर्वांचे तोंड पडले.

तोंडाच्या वाफा करणे: विनाकारण बडबड करणे.
उदा: संजय उगाचच तोंडाच्या वाफा करतो, त्याच कोणी काही एकत नाही.

थोबाड रंगवणे: काळशीलात लागवणे
उदा: सीमाने तो मुलगा छेड काढतो म्हणून त्याचे तोंड रंगवले.

दात ओठ खाणे: एखाद्यावर भयंकर चिडणे / संताप होणे
उदा: तो उगाचच माझ्यावर दात ओठ खत आहे

दडी मारणे: गायब होणे.
उदा: पावसाने आठ दिवसापासून दडी मारली आहे

दांडी मारणे: अनुउपस्थित राहणे.
उदा: आज मुलांनी शाळेला दांडी मारून शेतामध्ये धूम ठोकली.

दाढी चोळणे: एखाद्याचे पुढे पुढे करणे.
उदा: मला काम करून घेण्यासाठी कोणाची दाढी चोळायला नाही आवडत.

धूम ठोकणे: पळ काढणे.
उदा: चोरांनी पोलिसांना येताना पाहून धूम ठोकली.

नाक खुपसणे: नको तिथे आपले मत व्यक्त करणे, किंवा नको तिथे लक्ष घालणे.
उदा: जय विनोद च्या व्यवसायात विनाकारण नाक खुपसत असतो.

नाक मुरडणे: एकाद्या गोष्टीविषयी आपली नापसंती दर्शवणे/ असहमती दाखवणे
उदा: रीना ने आवडीची भाजी नसल्यामुळे नाक मुरडले.

नादी लागणे: मोहात पडणे / एखादी गोष्ट आवडणे.
उदा: लहान मुलांनी वाईट गोष्टीच्या नादी लागू नये.

भाग दोन मध्ये आपण आणखी वाक्प्रचार पाहू.

visit our facebook page:

2 thoughts on “Unique Marathi Phrases(मराठी वाक्प्रचार)”

Leave a Comment