The common mistakes we make while giving a speech.

भाषण करत असताना आपल्याकडून होणाऱ्या सर्वात भयानक चुका.

बऱ्याच वेळा आपल्याकडून स्टेज / मंचावरून बोलत असताना काही चुका होत असतात. या चुका आपण जाणून बुजून करत नाही, पण आजाणतेपणातून / आज्ञानातून अश्या चुका होत असतात. वेळीच आपल्याला त्या चुका लक्षात आल्या तर नकळतपणे होणारे आपले नुकसान टळू शकते. त्यासाठी हा Blog.

पुरेशी तयारी न करणे:  भाषणाची पुरेशी तयारी न करता स्टेजवर जाणे, जसे की विषयाचा अभ्यास, आपण कोणासमोर बोलणार आहोत याचा अभ्यास, सरावाचा अभाव या गोष्टी तुमचे भाषण खराब करू शकतात.

तुम्ही या आधी कितीही वेळा स्टेज वरुन भाषण केलेले असले तरीही आपण पहिल्या वेळा करतो त्यापद्धतीने तयारी करणे गरजेचे आहे. तुम्ही मोठ्या वक्त्यांच्या जर मुलाखती बघितल्या असतील तर ते हेच सांगतात कि तयारीने स्टेज / मंचावर जाणे कधीही योग्य. यामुळे आपल्याला काय बोलायचं आहे, किती बोलायचं आहे याचे गणित पहिलेच डोक्यात तयार असते.

श्रोत्यांशी संलग्नता नसणे (Lack of engagement with the audience): प्रेक्षकांशी जोडले जाण्यात अयशस्वी ठरणे, Eye-Contact, कथा/किस्से/प्रसंग, विनोद या गोष्टी भाषण करताना नसतील तर आपला प्रेक्षक आपल्याशी लवकर जोडला जात नाही. आणि जर आपले प्रेक्षक आपण आपल्याशी जोडण्यात यशस्वी नाही झालो तर मग त्या बोलण्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे वरील गोष्टी वापरा, समोर बसलेल्या प्रेक्षकांना आपल्यापासून तुटू देऊ नका.


स्वतःचा परिचय योग्यरित्या करून न देणे:
आपण स्टेजवरून बोलतो / भाषण करतो त्यामागे जवळ जवळ सर्वांचा  एकच हेतु असतो की आपले नाव झाले पाहिजे. बहुतेक जन स्वतः चा परिचय देण्यातच चूक करतात आणि मग हेतु साध्य होत नाही. त्यामुळे योग्य परिचय करून देणे खूप महत्वाचे आहे. परिचय करून देताना तुमचे नाव, व्यवसाय, तुमचे कार्य, तुम्ही जर एखाद्या पदावर काम करत असाल तर ते सांगणे आवश्यक आहे. समोरील लोकांना तुमच्या बद्दल सर्व माहीती असली तरीही तुमचा परिचय दया.

Slide / Visuals वर अवलंबून राहणे:
Slide / Visuals वर जास्त अवलंबून राहिल्यामुळे मूळ वक्ता बाजूला राहून Slide चा प्रभाव जास्त दिसतो. आपण मागील ब्लॉग मध्ये पहिले होते कि PPT / व्हिडीओ चा भाषण करताना उपयोग केला पाहिजे, पण हा वापर आताही नको. नाहीतर मूळ वक्ता बाजूला राहतो आणि अश्या व्हिडीओ चा प्रभाव जास्त राहतो किंवा लोक आपलं नाव डोक्यात / मनात घेऊन जाण्या ऐवजी हे व्हिडीओ डोकयात मनात घेऊन जातात. त्यामुळे PPT / व्हिडीओ वापरा पण प्रमाणात.

Nervous Habits: Nervous habits म्हणजे हातपाय सारखे हलववणे, एका पायावरून दुसऱ्या पायावर भार/वजन देणे, Eye-Contact न ठेवता सारखे एका दिशेला / खाली पाहणे, या गोष्टी भाषणापासून विचलित करतात आणि वक्त्याचा आत्मविश्वास कमी असल्याचे दर्शवतात. तुमच्या कुठल्याही कृतीतून तुमचा आत्मविश्वास कमी आहे हे दर्शवू नका. कारण तुमचा जर आत्मविश्वास समोरील लोकांना कमी दिसला तर ते आपल्या वरचढ ठरू शकतात. गोष्टी आपल्या Control मध्ये ठेवा. 

एकसुरी बोलणे:
एकसुरी बोलण्यामुळे भाषण रटाळवाणे / कंटाळवाणे वाटायला लागते. आपल्या बोलन्यामध्ये चढउतार असायला हवेत. जर तुमचं बोलण एकसुरी (Monotonous) होत असेल तर Tonality (आवाजातील चढ उतार) शिकून घ्या. कारण tonality तुमच भाषण फुलवते.

प्रेक्षकांशी जुळवून न घेणं:
आपल्या प्रेक्षकांशी जुळवून न घेता बोलणं म्हणजे त्यांची समज, भाषा, शिक्षण, त्यांची पार्श्वभूमी यांचा विचार न करणे या गोष्टी आपले भाषण खराब करू शकतात. जैसा देश वैसा भेष अस म्हणतात आपल्याकडे, ते भाषणात पण लागू पडते. जे तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बोलत असाल तर जास्त शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करू नका किंवा जास्तीचे इंग्रजी शब्द वापरू नका. तुम्हाला ग्रामीण भागातील काही म्हणी माहिती असतील तर त्याचा वापर करा.

जर तुम्ही शहरी भागात जाऊन बोलत असाल तर आपल्या बोलण्यात सुसंस्कृतपणा दिसू दया, तुम्ही जगात जे काही घडत आहे त्याबद्दल update असता हे दाखवा.

तुम्ही जर कॉलेज मध्ये बोलत आहात तर एखादे छान गाणे म्हणू शकता, किंवा तुम्ही जर शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय तर एखादी बोधकथा सांगा. 


वेळेच्या मर्यादांकडे दुर्लक्ष करणे: (Ignoring Time Constraints)
स्टेजवर वेळ मर्यादा पाळणे खूप गरजेचे असते. तुम्हाला जर आयोजकांनी 5 मिनिटांचा वेळ दिला आहे तर तुम्ही ४.५ मिनिटाला खाली उतरने अपेक्षित आहे. आपल्याला कधीही माईक मिळाला नाही असं करू नका. वेळेत भाषण संपवा. त्यामुळे तुमचे चांगलेच नाव होते, याउलट जर तुम्ही जास्त वेळ  बोलून आलात तर तो स्टेजवरील मान्यवरांचा, प्रेक्षकांचा आणि आयोजकांचा अपमान ठरतो. आणि शक्यता असते कि पुढील वेळी हे आयोजक आपल्याला संधी देतील कि नाही. त्यामुळे कुठेही गेलात तरी वेळ नक्की पाळा.


चुकीचा / अयोग्य विनोद: विनोद करताना वेळ, काळ, आपल्या समोर कोण बसले आहे या सर्व गोष्टींचे भान ठेवून विनोद करा. विनोदातून कोणत्याही व्यक्तीच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

Using filler words: filler म्हणजे के ते आधी समजून घेऊया, Filler म्हणजेच दर एक किंवा दोन शब्द नंतर वारंवार एकाच शब्द उच्चारणे.
उदा: मी अबक बोलत आहे, आज आपण क. ख. ड. यांची जयंती साजरी करत आहोत. त्यामुळे आपण इथे जमलेलो आहोत. त्यामुळे आज इथे हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे आम्ही आज फळ वाटप करणार आहोत. आणि त्यामुळे अस झाल, आणि त्यामुळे तिथे तस झाल.
येथे त्यामुळे हा filler शब्द सारखा सारखा येत आहे. आणि त्यामुळे प्रेक्षक Irritate होयला लागतात. 

मुद्देसूद न बोलणे:
बऱ्याच जणांना मुद्दे सोडून बोलण्याची सवय असते. पण मुद्दा सोडून बोलणे ही निरर्थक बडबड ठरते आणि हाती काहीच लागत नाही. तुम्ही स्टेज वर बोला किंवा इतर ठिकाणी, तुमचे बोलण हे मुद्देसूद झाले पाहिजे, आणि तसे होत नसेल तर ते करावे लागेल. म्हणून मोजक बोला, मुद्याच बोला आणि विषय संपवा.

सत्यतेचा अभाव (Lack of Authenticity):
समोरील लोकाना जे रुचेल पटेल टेच बोला, उगाचच्या बढाया मारू नयेत, कारण आपल्या पेक्षा समोरील लोक जास्त हुशार आहेत हे कायम लक्षात ठेवा. मोठ्या मोठ्या गोष्टी करताना त्या लोकाना किती पटतील हे पण पहावे.
गोष्टी सरळ साध्या आणि सोप्या ठेवा, जसे आहात तसे रहा, ओढून ताणून गोष्टी करू नका. लोकाना Natural पणा जास्त आवडतो.

भाषणाचा शेवट: भाषणाचा शेवट जर कमकुवत असेल तर वक्त्याला जी छबी / छाप निर्माण करायची आहे त्यात यश मिळणार नाही.  अंत भला तो सब भला, असं म्हणतात ते काही खोट नाही. भाषणाचा शेवट देखील आपल्याला संपूर्ण भाषण इतकाच प्रभावी असला पाहिजे.

या सामान्य चुकांची जाणीव ठेवून आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करून, तुम्ही अधिक प्रभावी आणि उत्तम वक्ता बनू शकता.

लक्षात ठेवा आज ठरवले आणि उद्या झाले अस होत नसते, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देणे महत्वाच्या आहे, योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन प्रशिक्षण घेणे योग्य ठरते.


हा संपूर्ण Blog माझे आज पर्यंतचे वचन, शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव, internet वरून केलेला research यावर आधारित आहे. यात काही काही त्रुटि वाटत असतील तर तुम्ही आणखी research करू शकतात.

आपण संपूर्ण dostmaza.com चा संपूर्ण Blog वाचलात यासाठी धन्यवाद. नवनवीन माहितीसाठी भेट देत रहा.

या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा, तुमचे भाषण होईल एकदम भारी!
दहावी (SSC) नंतर पुढे काय? What next after 10th?
भाषण कसे करावे?  How to make a speech in marathi?
उत्तम भाषण म्हणजे काय? What is a good speech?
उत्तम भाषणाची व्याख्या.
भाषणाची भीती का वाटते?
Public speaking techniques in Marathi.

1 thought on “The common mistakes we make while giving a speech.”

Leave a Comment