Importance of Gesture and Posture in Public Speaking & Business Meetings.

हावभाव आणि हातवाऱ्यांचे महत्त्व

हावभाव आणि हातवाऱ्यांचे महत्त्व मौखिक आणि मुक दोन्ही प्रकारच्या संवादामध्ये खूप मोठे आहे. आपण हावभाव व हातवाऱ्यांचा उपयोग करून न बोलता किंवा न लिहता देखील आपला संदेश समोरील व्यक्ती पर्यन्त पोहचवू शकतो. हा एक संवादकौशल्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे, या दोन गोष्टींमुळे तुमचे संवाद कौशल्य आणखी बहारदार व उत्तम बनते. हावभाव आणि हातवारे समोरील वक्ता समजण्यासाठी, त्याचे व्यक्तिमत्त्व दर्शवण्यासाठी खूप आवश्यक आहे. या दोन गोष्टी समोरील श्रोत्यांना खिळवून ठेवत असतात.

आपण या ब्लॉग मध्ये gesture and posture चे भाषणा मधील महत्त्व, आणि gesture and posture चे व्यावसायिक मीटिंग मधील महत्त्व बघणार आहोत.

Public Speaking मध्ये gesture and posture चे महत्त्व:

Public Speaking (भाषण) मध्ये तर या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाचा role करत असतात. आजच्या ब्लॉग मध्ये आपण gesture and posture चे महत्व बघणार आहोत.

हावभाव आणि हातवारे आपल्या बोलण्याचे वजन वाढवतात:

हावभाव आणि हातवारे आपल्या मौखिक बोलण्याला अधिक स्पष्टता देतात आपल्या शब्दाना आणखी वजन आणि महत्व प्राप्त करून देतात. आपले बोलणे अधिक अर्थपूर्ण आणि स्पष्ट होत असते. या मुळे आपल्या बोलण्याला एक ऊंची प्राप्त होते, आपल्या भावना अधिक स्पष्टपणे दिसतात, आणि आपल्या शब्दांना अधिकचे संदर्भ भेटत असतात.

हावभाव आणि हातवाऱ्यांमुळे आपण जे बोलत आहोत त्याचे हुबेहूब चित्र श्रोत्यांच्या मनात डोक्यात तयार होत असते, आणि आपण जे बोलत आहोत त्याचे चित्र समोरील प्रेक्षकांच्या मनात तयार होणे हेच एक परिपूर्ण वक्त्या यश असू शकते. हावभाव आणि हातवाऱ्यांचा उपयोग करून जर आपण एखादे उदाहरण, गोष्ट, कविता मांडली तर ती आणखी उत्तम सादर होते.

Visual Engagement :
Gesture and posture (हावभाव आणि हातवारे) आपल्या समोरील श्रोत्यांना आपल्या बोलण्यामध्ये अडकवून ठेवतात आणि त्यांचे लक्ष सुरवातीपासून शेवटपर्यंत आपल्यावरून हालू देत नाहीत. आपल्या समोरील श्रोत्यांना फक्त शरीराने नाही तर मनाने देखील आपल्यासोबत जोडलेले ठेवतात.

Nonverbal Communication:
Public Speaking असेल किंवा तुमचे रोजचे बोलणे, हे फक्त शब्दांपुरते मर्यादित नसते तर तुमचे हावभाव, हातवारे हे तुमच्या भावना, तुमचा उत्साह, तुमची जिद्द, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास हे समोरील व्यक्तीला दाखवून देत असतात आणि या गोष्टी तुमच्या बद्दलचा लोकांचा विश्वास आणि विश्वासार्हता प्रस्थापित करत असतात.

Visual Memory and Impact:  
मानवी मेंदू हा शब्दांपेक्षा चित्र जास्त लवकर लक्षात ठेवतो. तुमचे हावभाव आणि हातवारे जर Powerful असतील तर नंतर भविष्यात देखील तुमचे शब्द तुमच्या समोरील श्रोत्यांना आठवून देतात.

Nonverbal Feedback:
आपण समोरील लोकांचे Gesture and posture बघून आपले बोलणे योग्य दिशेने सुरू आहे की नाही हे ठरवू शकतो. पुढे झुकणे, आपल्या बोलण्याला होकार देणे, चेहऱ्यावर Confusion दिसणे, एकमेकात कुजबूज करणे यावरून तुम्ही तुमचा विषय योग्य दिशेने आहे की नाही हे ठरवून तो पुढे कसा change करायचा हे पाहू शकता. यामुळे तुमचे होणारे नुकसान टळेल.   

Gesture and Posture चे व्यावसायिक मीटिंग मधील महत्त्व.

Gesture and Posture हे व्यावसायिक मीटिंग मध्ये अतिशय महत्त्वाचे असतात. उत्तम संभाषण, तुमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी मदत करत असतात. त्यातून तुमचा व्यावसायिक फायदा होत असतो, तो कसा ते आपण खाली पाहणार आहोत.

Nonverbal Communication:
Business Meetings मध्ये तुमच्या शब्दांपेक्षा तुमची Body Language आणि तुमचे Gesture and Posture जास्त बोलत असतात. Gesture and posture तुमचा आत्मविश्वास, तुमची तुमच्या कामाच्या प्रतीची आत्मीयता, तुमचा interest दाखवत असतात आणि या गोष्टी समोरील व्यक्तीला प्रभावित (influence) करत असतात.

योग्य हातवारे आणि मोकळे हावभाव ठेवणे यामुळे तुमचे nonverbal communication आणखी उत्तम बनते आणि त्यामुळे तुमच्यामध्ये आणि तुमच्या क्लाईंट मध्ये आणखी मोकळा संवाद होतो, आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा तुमच्या पुढील deal साठी होत असतो.
सरळ रेषेत बसने, alert (सावध) बसने, सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे आणि सर्व आपल्या नियंत्रणात आहे हे दाखवणे, या गोष्टी तुमचा सकारात्मक दृष्टिकोण दर्शवत असतात.

Emphasizing Key Points (महत्वाचे मुद्दे ठळकपणे दर्शवण्यासाठी):
तुम्ही जेव्हा तुमच्या Business Meeting मध्ये बोलत असता तेव्हा तुम्ही महत्वाचे मुद्दे (key point) hand movement चा वापर करून अधिक ठळकपणे दर्शवू शकता. त्यामुळे तुमचं Client त्या particular point कडे जास्त लक्ष देईल आणि त्याला काही प्रश्न असेल तर लगेच विचारेल.
Professionalism and Credibility: व्यावसायिकता आणि विश्वासार्हता तुम्ही स्वतःला Business Meeting मध्ये कसे present करता यावरून तुमची credibility (विश्वासार्हता) आणि तुमचे Professionalism (व्यासायाप्रतीची निष्ठा) दिसत असते.

जसे आपण योग्य Gesture & Posture पहिले तसेच काही अयोग्य देखील असतात. ते आपण टाळले पाहिजेत ली ज्यामुळे आपली नकारात्मक image निर्माण नाही झाली पाहिजे.
आपण काही उदाहरणे पाहुयात.

उदा: 1) आपल्यासमोर जर कोणी एखादा मुद्दा मांडत असेल तर आपण मोबाइल / घडयाळ किंवा इतरत्र न पाहता जो व्यक्ति बोलत आहे त्याच्याकडेच पहावे.

2) हात, पाय, डोके खाजवू नये किंवा सारखा सारखा डोक्याला अंगाला कपड्याला हात लावू नये.

3) आपण ज्या स्थितीत बसलो आहोत ती Position सारखी बदलू नये.

4) चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवावे.

5) आपल्याला एखादा प्रश्न असेल तर बोलणाऱ्या व्यक्तीला मध्येच न थांबवता हात / बोट वर करावा. 6) तुम्ही जर official meeting करत आहात तर जास्त  मोठ्याने हसणे, बोलताना टाळी देणे किंवा इतर व्यक्ति बोलत असताना तिसऱ्या व्यक्तीला खुणावणे या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.

7) हस्तांदोलन करताना समोरच्या व्यक्तीचा हात जास्त दाबला जाणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्ही जर opposite gender च्या व्यक्तीशी handshake करत आहात तर तो कसा करतात हे पहिलेच शिकून घ्या. कारण चुकीचा स्पर्श वाटायला नको.

या Blog मधून आपल्याला कळले की,
तुम्ही योग्य Gesture and posture चा वापर करून लोकांना हसवू शकता, रडवू शकता. तुम्ही योग्य Gesture and posture चा वापर करून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकता. फक्त स्वत:चेच नाही तर समोरील व्यक्तीचे Gesture and posture पाहून तुम्ही तुमचे पुढील बोलणे कोणत्या दिशेला घेऊन जायचे ते ठरवू शकता.
तसेच तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात योग्य हावभाव आणि हातवाऱ्यांचा उपयोग करून तुमची व्यावसायिक वृद्धी करू शकतात. तुम्ही तुमची जी प्रतिमा आहे ती आणखी उत्तम करू शकता.

खालील काही गोष्टी लगेच करून पहा तुम्हाला त्याचा result तत्काळ दिसेल.

तुम्ही हा लेख वाचून जिथे आता जाणार आहात किंवा ज्या व्यक्तीला भेटणार आहात त्याला भेटत क्षणी छान smile दया, हस्तांदोलन करा. चेहऱ्यावर तेच स्मित कायम ठेवून योग्य हातवाऱ्यांचा उपयोग करून तुमचं जो काही विषय आहे तो मांडा. समोरील व्यक्तीचे म्हणणे देखील तश्याच पद्धतीने एकूण घ्या. वर आपण जे मुद्दे पहिले त्या सर्वांचा उपयोग करा. तुम्हाला सकारात्मक result नक्की भेटतील.
नवनवीन माहितीसाठी भेट देत रहा dostmaza.com ला.

असेच नवनवीन लेख, माहिती, blogs वाचत राहण्यासाठी भेट देत रहा.
आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा. Share करा.

या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा, तुमचे भाषण होईल एकदम भारी!

दहावी (SSC) नंतर पुढे काय? What next after 10th?

भाषण कसे करावे?  How to make a speech in marathi?

उत्तम भाषण म्हणजे काय? What is a good speech?

उत्तम भाषणाची व्याख्या.

भाषण करताना हातवाऱ्यांचे महत्व,
importance of gesture and posture in business meetings.
importance of gesture and posture in public speaking.

1 thought on “Importance of Gesture and Posture in Public Speaking & Business Meetings.”

Leave a Comment