या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा, तुमचे भाषण होईल एकदम भारी!

स्टेजवर बोलायला गेलं कि, भीती वाटते (Stage Fear), पोटात गोळा येतो, हाथ पाय थरथरतात, घाम फुटतो, समोरच काहीच दिसत नाही आणि आपली विचार करण्याची क्षमता एकदम शून्य होते. हा अनुभव बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी आला असेल.

(How to overcome stage fright)
बऱ्याच वेळा वाटत कि आपण देखील स्टेज वर जावे, स्टेज गाजवावे, आपल्यासाठी टाळ्या वाजाव्यात, आपले देखील नाव व्हावे.

असं नाही कि फक्त राजकीय (Political) सामाजिक (Social) क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच स्टेज वरून बोलावे लागते, तर सर्व सामान्य लोकांना (General Public) देखील कधी ना कधी मंचावर बोलण्याची वेळ येतेच येते.

खालील गोष्टी नक्कीच तुमचा मंचावरचा विश्वास वाढवतील, नक्कीच याचा फायदा इथून पुढच्या तुमच्या प्रत्येक भाषणात होईल.

(The following will definitely boost your confidence on stage, which will definitely benefit you in every speech you make from here on out.)

1) सराव सराव आणि सराव (Practice practice and only practice),
तुम्ही भाषणाचा जितक्या अधिक वेळा सराव कराल तेवढी तुम्हाला तुमची चिंता(anxiety), भीती (Fear), अस्वस्थपणा घालवायला मदत होते. तुम्ही उत्तम मुद्द्यांसह तयार होता. तुमचे भाषण भरकटत नाही. तुम्ही मुद्देसूद (to the point) बोलता. या मुळे तुमचे भाषण देखील रटाळवाणे वाटत नाही. तुम्ही दिलेल्या वेळेत भाषण संपवून थांबता.

2) तुमच्या श्रोत्यांशी Eye-Contact ठेवा.
हे तुम्हाला तुमच्या श्रोत्यांशी जोडेल, तुमचे भाषण आणखी आकर्षक बनवेल. तुम्ही समोर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघून बोलत असाल तर ते तुमच्या भाषणात अधिक रुची घेतात. त्यांना वाटते कि तुम्ही त्यांच्याशीच बोलत आहात (They think you are talking to them personally). आणि या मुळे तुम्ही त्यांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे Eye Contact तुटू देऊ नका. प्रत्येक कोपऱ्यात आपली नजर गेलीच पाहिजे.

3) बोलताना हातवार्यांचा उपयोग करा(Use gestures when speaking). 
याने तुमचे ठळक मुद्दे अधोरेखित होतात, तुमच्या भाषणात आणखी जीव येतो.

बोलताना आपले हातवारे आपल्या बोलण्यातील खरेपणा दाखवत असतात. हातांचा जास्तीस्त जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा, हा प्रयत्न Natural असला पाहिजे तुम्ही जर जबरदस्तीने हातवारे करत असाल तर तुम्ही विक्षिप्त देखील दिसू शकता. हे होणार नाही याची काळजी घ्या.

टीप: दुःखद ठिकाणी बोलताना हातांचा वापर करा पण एकदम कमी.

4) बोलताना शब्दांमध्ये स्पष्टपणा असावा, वेग मध्यम (Normal) ठेवा.
वेगाने बोलल्यामुळे तुमच्या श्रोत्यांना तुम्ही काय बोलताय ते काळत नाही आणि हळू बोलल्याने श्रोते बोर (Bore) होतात. तोंडातल्या तोंडात शब्द बोलू नका (Mumble) किंवा कर्कश्श वाटेल इतका पण मोठा आवाज (Loud) नको. तुम्ही दररोज बोलता तितकाच आवाज ठेवा. माईक वर बोलत असाल तर माईकचा आवाज किती आहे ते पहा आणि त्यानुसार किती मोठा आवाज ठेवायचा ते ठरवा.

5) माईक जपून वापरा (Use the mic sparingly).
माईक वर बोलत असताना बरोबर माईकच्या समोर उभे राहा, माईक जास्त जवळ किंवा लांब जाणार नाही याची काळजी घ्या. माईक जर वायरचा असेल तर वायर आपल्या किंव्हा इतरांच्या पायात येणार नाही याची काळजी घ्या.

6) विनोदबुद्धीचा वापर करावा (Use sense of humor).
योग्य ठिकाणी केलेला योग्य विनोद तुमच्या श्रोत्यांना तुमच्याशी अधिक जोडतो. तुमचा संदेश त्यांच्या मनात लवकर पोहचतो.

भाषणात विनोदाचा वापर करा पण कुठेही अतिपणा होणार नाही याचे भान ठेवा. आपल्या विनोदाने कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. जर आपल्या समोर स्त्रिया / लहान मुलं असतील तर आपल्या विनोदातून दुहेरी अर्थ निघणार नाही हे पहा.

7) तुमच्या स्व:अनुभवातून (personal experience) बोलण्याचा प्रयत्न करा.
लोक स्व:अनुभवातून बोलणाऱ्या वक्त्यावर जास्त विश्वास (Trust) ठेवतात (People trust a speaker who speaks from personal experience). तुम्ही जेवढे तुमचे अनुभव, तुमच्या आयुष्यातील घटना / किस्से सांगाल तेवढे लोक आपल्यावर जास्त विश्वास टाकतात.

8) शक्य असल्यास PPT / व्हिडीओ चा वापर करावा.
फोटोग्राफिक मेमरी जास्त काळ टिकते. लाव रे तो व्हिडीओ हे शब्द तर आपल्याला आठवतच असतील. अशेच व्हिडीओ PPT आपल्याला वापरता आले तर उत्तमच.

9) संभाषणाच्या स्वरात बोला (Speak in a conversational tone).
 जास्तीचे शब्दजाल (Technical Term ) वापराने टाळा, कारण लोकांना ते समजलं नाही तर भाषण रटाळ होते. उदा: तुम्ही जर डॉक्टर आहात आणि तुम्ही एखाद्या शिबिराला गेलात तर रोगांची नाव, त्याचे उपाय, त्यावरील औषध हे सर्व सांगत बसण्यापेक्षा सध्या सोप्या भाषेत दररोज काय काळजी घ्यायची कि ज्यामुळे आपले आरोग्य सुधृढ राहील. हे सांगितलं तर लोकांना जास्त आवडेल.

10) तुमच्या श्रोत्यांना (listeners) समजेल अश्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करा.
आपल्या समोर बसलेल्या लोकांचे साधारणतः Background काय आहे ते पहा आणि त्यानुसार आपली भाषा ठरवा. उगाच जास्त शुद्ध किंवा प्रमाण भाषेच्या वाट्याला जाऊ नका (Don’t go for pure or standard language). तुम्ही समोरील लोकांना आपलेशे वाटायला पाहिजेत.

11) तुमच्या देहबोलीवर (Body Language) योग्य लक्ष ठेवा.
सरळ उभे रहा(Stand up straight), तुमच्या चेहऱयावर स्मित हास्य(Smile) ठेवा, चेहरा बोलका ठेवा. विनाकारण आपण खूप शिस्तप्रिय / शिष्ट (disciplined) आहोत हे दाखवू नका. मंचावर गेल्यापासून खाली येईपर्यंत स्मितहास्य जाऊ देऊ नका.

12) भाषण करताना मध्ये मध्ये गोष्टी किस्से सांगा ज्यामुळे श्रोते जोडलेले राहतील.
गोष्टींमुळे भाषण रटाळ होत नाही. एका भाषणामध्ये एक ते तीन गोष्टी किस्से असावेत. किस्से सांगताना रंगतदार कसे होतील हे पहा. जर एखादी गोष्ट सांगत आहात तर त्यातून काय बोध निघतो हे सांगा. गोष्ट / किस्सा जास्त मोठा नसावा.

13) मधे-मधे श्रोत्यांना प्रश्न उत्तर करत जा.
प्रश्न उत्तरांमुळे लोक जागे राहतात. आप आपसात कमी बोलतात (gossiping). श्रोत्यांना तुमच्या कडे लक्ष देण्यास भाग पाडा.

14) स्वतःशी ईमानदार रहा(Be honest with yourself).
स्वतःच्या आवाजात आणि स्वतःच्या मूळ लहेज्यातच बोला. उगाचंच कोणाची नक्कल करायला जाऊ नका. नक्कल करणे खूप कठीण काम आहे, लक्षात ठेवा नक्कल करताना आपली अक्कल निघायला नको. जमतंय तितकच करा, जास्तीच काही करू नका.

15) अकस्मात येणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहा.
On the Spot काही बदल करावे लागले तर तयारी ठेवा. कारण वेळ कोणती आणि कोणावर येईल सांगता येत नाही. अकस्मात येणाऱ्या गोष्टींसाठी आपण तयार असायला हवे. या अकस्मात गोष्टी आपला खेळ संपवू शकतात. so be ready for on the spot things.

16) स्वतःवर विश्वास ठेवा(Believe in yourself.).
विश्वास ठेवा कि तुम्ही काहीतरी उत्तम बोलणार आहात. Self Motivation पेक्षा मोठं Motivation कोणतं असू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, आपण हा मंचच काय उद्या जग जिंकू. हा जर विश्वास तुम्हाला असेल तर दिल्ली दूर नही.

17) माईक वर बोलायला जाण्याआधी दीर्घश्वास(deep breath) घ्या.
मन शांत ठेवा, तुमच्या भाषणाचे पहिले दोन वाक्य घोकत राहा. स्मित हास्य करत राहा. मनाला डोक्याला सांगा कि आज एकदम भारी होणार सर्व आणि करा सुरु तुमचे भाषण.

एवढं करून पहा, नक्की तुम्ही देखील उत्तम बोलाल.

लेख आवडला असल्यास कमेंट नक्की करा. share करा. तुमचं एक share आमचं पाठबळ मनोबल वाढवत, आम्हाला पुढे लिहण्यास प्रेरणा देत असत.

धन्यवाद.

भाषण कसे करावे? उत्तम भाषण म्हणजे काय?

मला मंचाची भीती वाटते. मंचाची भीती कशी घालावी?

भाषण गाजवण्याचा पद्धती.

स्टेजची भीती कशी जाईल?

मंचावर भीती का वाटते? भाषणाची भीती का वाटते?

8 thoughts on “या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा, तुमचे भाषण होईल एकदम भारी!”

Leave a Comment